महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खाकीला बदनाम करत केला महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच लंपट हवालदार फरार

एका 28 वर्षीय विवाहितेने तिचा पती मंगेश साळुंखे, सासरा विष्णू, सासू बेबी, दीर गणेश व जाऊ माया यांच्याविरोधात 17 एप्रिल 2019 रोजी भांदवि कलम 498, 323, 504, 506, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याबाबत जबाब नोंदविण्यासाठी पीडिता पोलीस ठाण्यात आली.

पोलिस ठाणे पडघा आणि सोबत हवालदार देविदास चव्हाण

By

Published : Jun 30, 2019, 9:15 PM IST

ठाणे - येथील हवालदाराने एका महिलेचा विनयभंग करत खाकी वर्दीला बदनाम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पडघा पोलीस ठाण्यात 28 वर्षीय विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याचा तपास एका लंपट हवालदाराकडे आहे. मात्र, त्याने चौकशी करण्याच्या बहाण्याने तिला एकांतात बोलण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला आहे.

पोलिस ठाणे पडघा आणि सोबत हवालदार देविदास चव्हाण

याप्रकरणी, या हवालदाराविरोधात पडघा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच हा हवालदार फरार झाला. देविदास चव्हाण असे त्या हवालदाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका 28 वर्षीय विवाहितेने तिचा पती मंगेश साळुंखे, सासरा विष्णू, सासू बेबी, दीर गणेश व जाऊ माया यांच्याविरोधात 17 एप्रिल 2019 रोजी भांदवि कलम 498, 323, 504, 506, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याबाबत जबाब नोंदविण्यासाठी पीडिता पोलीस ठाण्यात आली. त्यावेळी पीडितेला पोलीस ठाण्यामध्ये एकांतात बोलवले. आणि तू शहापूर येथे एकटी ये, आपण फिरायला व हॉटेलमध्ये जाऊ असे सांगितले, हे ऐकून पीडितेला धक्का बसला व ती भयभीत झाली.

खाकीला बदनाम करत केला महिलेचा विनयभंग

त्यानंतर पीडिता माहेरी गेली. त्यानंतरही त्या हवालदाराने पुन्हा 5 ते 6 वेळा मोबाइलवर संपर्क करून फिरायला जाण्याचा तगादा लावला होता. अखेर या लंपट हवालदाराच्या त्रासाला कंटाळून पीडितेने ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ, शिवाजी राठोड यांच्याकडे लेखी तक्रार केली. आणि लंपटावर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार, पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना चौकशीचे आदेश दिले.

या सखोल चौकशीत पीडितेचा विनयभंग केल्याचे निष्पन्न झाल्यावर हवालदार चव्हाण विरोधात भांदवी कलम 345(अ) (ड) 2, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच हा हवालदार फरार झाला. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रेखा लोंढे करीत आहेत. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details