ठाणे- शहरातील एका महिला कार्यकर्तीच्या तत्परतेमुळे गरोदर महिलेचा जीव वाचला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सर्व वाहतूक बंद आहे. अशात एका गरिब गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. ही महिला अत्यंत नाजूक परिस्थितीमध्ये वेदनेने व्हिवळत होती.
माणुसकी, महिला कार्यकर्ती मध्यरात्री गेली गर्भवती महिलेच्या मदतीला धावून - कोरोनाचा परिणाम
शहरातील एका महिला कार्यकर्तीच्या तत्परतेमुळे गरोदर महिलेचा जीव वाचला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सर्व वाहतूक बंद आहे. अशात एका गरिब गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या. ही महिला अत्यंत नाजूक परिस्थितीमध्ये वेदनेने व्हिवळत होती. लॉकडाऊनमुळे तिच्या पतीचे काम बंद झाल्याने घरची एकदम बिकट परिस्थिती आहे. अशा अवस्थेमध्ये रुग्णालयात कसे जायचे, हाच मोठा प्रश्न होता.
लॉकडाऊनमुळे तिच्या पतीचे काम बंद झाल्याने घरची एकदम बिकट परिस्थिती आहे. अशा अवस्थेमध्ये रुग्णालयात कसे जायचे, हाच मोठा प्रश्न होता. अशातच शिल्पा सोनोने यांना शेजारी राहणाऱ्या महिलेने याबद्दल माहिती दिली. वेळ रात्री साडेबाराची होती. ही माहिती मिळताच ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष शिल्पा सोनोने आणि त्यांची मुलगी डॉ. स्नेहा सोनोने घटनास्थळी पोहोचले.
ती स्त्री खूप गंभीर परिस्थितीमध्ये होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अत्यावश्यक सेवा 108 या क्रमांकावर मदतीसाठी कळविण्यात आले. पण काहीही प्रतिसाद न मिळाल्याने शिल्पा सोनोने यांनी आपल्या वाहनाने गरोदर महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा ठाणे येथे त्यांना अॅडमिट करण्यात आले. येथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले, आम्ही डिलिव्हरीसाठी घेतोय मात्र बाळाची गॅरंटी देऊ शकत नाही. कारण, बाळाची हालचाल व हृदयाचे ठोके जाणवत नाहीत. त्यावर काहीही करून या गरीब स्त्रीला जीवदान द्या, अशी विनंती केली. त्यानंतर रात्री दोन वाजता डिलिव्हरी झाली. यात बाळ आणि माता दोघेही सुखरूप आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले.