महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nana Patole : मुख्यमंत्री शिंदे यांच्या अपात्रतेचा निर्णय १० ऑगस्टपूर्वी घ्यावाच लागेल; काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन

प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या विभाग व सेलची एक दिवसीय कार्यशाळा शुक्रवारी ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित होते. या कार्यशाळेआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून मोदी सरकारवर टीका केली.

Nana Patole Reaction
काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन

By

Published : Jul 7, 2023, 10:34 PM IST

प्रतिक्रिया देताना नाना पटोले

ठाणे: राज्यात डाकूगिरी करून लूट करणारे सरकार अस्तित्वात आलेले आहे. राज्यातील मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अपात्रतेचा निर्णय १० ऑगस्टपूर्वी हा घ्यावाच लागेल, जर निर्णय दिला नाही तर सुप्रीम कोर्ट त्याबाबत निर्णय देऊ शकते. त्यामुळे ते निश्चितच अपात्र होतील असे ठाम मत राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. राज्यात लोकशाहीला न मानणारे सरकार आहे. त्यामुळे काहीही होऊ शकते. राज्यात आधी ईडी सरकार होते आता तीन तिघाडा सरकार असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. ठाण्यात आज काँग्रेसच्यावतीने विविध विभाग व सेलची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.


न्याय व्यवस्थेवर सरकारचा दबाव : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नीरव मोदी, ललित मोदी यांच्या विरोधात काय चुकीचे बोलले आहेत ते सांगावे. तर ते डाकू चोर नसतील तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे, अदानी आणि मोदी यांचे नाते काय? नीरव मोदी आणि नरेंद्र मोदी यांचे नाते काय? याचे उत्तर केंद्राने द्यावे असा सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राहुल गांधी यांच्या विरोधात जो न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्याचा जाब लोकशाही मार्गने आंदोलनाच्या माध्यमातून विचारला जाईल. असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच न्याय व्यवस्थेवर सरकारचा दबाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.




काँग्रेसचा एकही भाजपमध्ये जाणार नाही: राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा निघाल्यानंतर महाराष्ट्रातल्या भाजपच्या पायाखालची वाळू सरकारला लागली. ही पदयात्रा महाराष्ट्रात आली तेव्हा काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जाणार अशी बोंब भाजपच्या नेत्यांनी उठवली होती. अजित पवारांनंतर काँग्रेस फुटणार असा दावा केला जात आहे. मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकही आमदार भाजप सोबत जाणार नाही असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.



मोदी सरकारविरोधात नाना पटोले यांचे आंदोलन : ठाण्यात आज काँग्रेसच्या वतीने विविध विभाग व सेलच्या एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. निवडणूक आयोगाने सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागतील असे सांगितले आहे. त्यावर त्यांना छेडले असता मोदी हे तो मुनकीने हे त्यामुळे निवडणुका लागतील किंवा लागूही शकत नाहीत. दीड वर्ष होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या नाहीत. ठाण्याची परिस्थिती काय झालेली आहे हे यावरून दिसत आहे, प्रशासक आणि राज्यकर्त्यांच्या माध्यमातून केवळ लूट सुरू आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

डाकू आणि लूट करणारे सरकार: आता लोकशाहीला न म्हणणारे सरकार आहे, त्यामुळे काहीही होऊ शकते. आधी ईडी सरकार होते आता तीन तिघाडा सरकार आहे. त्यामुळे त्यांना निवडणुका पाहिजे की नाही हा एक प्रश्न आहे. त्यातही निवडणूक लागल्या तर त्याचे आम्ही स्वागतच करू. भाजपमध्ये रोज भरती केली जात आहे, जनेतची देखील जीएसटी आणि विविध करांच्या माध्यमातून लूट केली जात आहे. त्यामुळे हे डाकू आणि लूट करणारे सरकार असून ते सत्तेची मजा घेण्याचे काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी राहुल गांधी यांचे अपील फेटाळल्याने नाना पटोले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहा खालील रस्त्यावर निषेध आंदोलन केले. यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.



हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात लवकरच निवडणुका होणार; काँग्रेस विधिमंडळ पक्षाची विधानभवनात बैठक
  2. Maharashtra Political Crisis : 'केंद्रीय यंत्रणांची भिती दाखवून..', नाना पटोलेंचा भाजपवर मोठा आरोप
  3. Corruption In BJP: भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात आणि विचारात - नाना पटोले

ABOUT THE AUTHOR

...view details