महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मीरा भाईंदरमध्ये ख्रिश्चन-मुस्लिम समाजासाठी दफनभूमीची जागा उपलब्ध करून द्या, काँग्रेसची मागणी - मीरा भाईंदर महानगरपालिका बातमी

सध्या मीरा भाईंदर हद्दीत मुस्लिम समाजाच्या दोन तर ख्रिश्चन समाजासाठीची एक दफनभूमी आहे. जागेच्या कमतरतेमुळे मीरा भाईंदर शहरात कोरोना आजारामुळे मृत पावलेल्यांना दफन करणे अवघड आहे. त्यामुळे मीरा भाईंदर हद्दीतील पेणकारपाडा येथील आरक्षित असलेली जागा दफन भूमीसाठी तत्काळ उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली.

दफनभूमी साठी जागा द्या काँग्रेस ची मागणी
दफनभूमी साठी जागा द्या काँग्रेस ची मागणी

By

Published : Jul 16, 2020, 8:27 PM IST

ठाणे :कोरोनाच्या काळात मुस्लिम आणि ख्रिश्चन दफनभूमीसाठी जागेच्या कमतरतेमुळे मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्रमांक. ३५३ ही जागा उपलब्ध करून देण्यात यावी. या मागणीसह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज(गुरुवार) मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांची भेट घेतली.

मीरा भाईंदर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पालिका मुख्यालयात आयुक्तांची भेट घेऊन सदर विषय सविस्तर मांडला. शहरात कोरोनाच्या रुगणांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. तर, मृत्यूची संख्येत देखील वाढ होताना दिसत आहे. सोबत शहरबाहेरील दोन्ही समाजाच्या ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मनपा क्षेत्रात उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. त्यांचे सुद्धा शासन नियमानुसार अंत्यविधी हे मनपा क्षेत्रातच करावे लागत आहेत. त्यामुळे शहरात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील मृत व्यक्तींच्या मृतदेहासाठी जागा जास्त लागत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नियमानुसार, कोरोना मृतदेहांना दफन केलेल्या जागेत अन्य मृतदेहांना दफन करता येत नाही. त्यामुळे नजीकच्या काळात दफनभूमीसाठी जागा अपुरी पडणार आहे. सध्या मीरा भाईंदर हद्दीत मुस्लिम समाजाच्या दोन तर ख्रिश्चन समाजासाठीची एक दफनभूमी आहे. जागेच्या कमतरतेमुळे मीरा भाईंदर शहरात कोरोना आजारामुळे मृत पावलेल्यांना दफन करणे अवघड आहे. शिवाय कोरोनाच्या मृतदेहांना दहा फूट खोल, सहा फूट लांब आणि चार फूट रुंद खड्डा खोदावा लागतो, तसेच, त्या ठिकाणी पुढील १० वर्षे अन्य मृतदेह दफन करता येत नाही. त्यामुळे मीरा भाईंदर हद्दीतील पेणकारपाडा येथील आरक्षण ३५३ अ - ७२००० चौ. मी. ही जागा दफन भूमीसाठी आरक्षित आहे. त्यातील ४९७८.४३ चौ. मी. एवढी जागा पालिकेच्या ताब्यात आलेली सुद्धा आहे. कोरोनाचा वाढत प्रार्दुभाव आणि मृत्यूदर पाहता सदर जागा दफनभूमीसाठी तत्काळ उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद सामंत, जुबेर इनामदार, अश्रफ शेख, राजीव मेहरा तसेच युवक जिल्हा अध्यक्ष दीप काकडे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details