ठाणे -आगामी ठाणे महापालिकेसाठी काँग्रेस पक्ष तयारीला लागला ( Thane Corporation Election ) आहे. काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्यास ठाण्यात ओबीसीचा महापौर बसवू, असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले ( Obc Mayor In Thane Nana Patole ) आहे. ठाण्यातील एन.के.टी. सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी संघटनेच्या मेळाव्यात पटोले बोलत होते.
नाना पटोलेंनी यावेळी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आगामी निवडणूक पाहता काँग्रेसने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. त्यानुसार आम्ही आमची तयारी सुरु केली आहे. नवी मुंबई येथे होणाऱ्या विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, अश्या मागणीचे पत्र माझ्याकडे आले आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सकारात्मक विचार करणार आहे.
भाजपा सर्वात मोठी भ्रष्टाचारी पार्टी