ठाणे- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र जोरदार सुरू असताना ठाण्यात देखील चुरशीची लढाई रंगणार आहे. सेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी अविचारी खासदार असे म्हटले. लोकसभेत बोलणारा उमेदवार अशी ठाण्याची असेलेली परंपरा खासदार राजन विचारेंनी खंडीत केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
'लोकसभेत बोलणारा उमेदवार अशी ठाण्याची परंपरा खासदार राजन विचारेंनी खंडीत केली' - anand paranjpe
लोकसभेत बोलणारा उमेदवार अशी ठाण्याची असेलेली परंपरा खासदार राजन विचारेंनी खंडीत केली. आनंद परांजपे यांची टीका.
आनंद परांजपे यांना राजकीय पार्श्वभूमी असून वडील प्रकाश परांजपे हे देखील सक्रिय राजकारणात होते. त्यामुळे लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या आनंद परांजपे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. आनंद परांजपे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून नरेंद्र मोदींच्या हुकूमशाही विरोधातील ही लढाई असल्याचे परांजपे यांनी सांगितले.
ही विचारांची लढाई असून ठाण्याच्या विकासावर लक्ष केंदीत करणाऱ्या अनेक मुद्यावरची ही लढाई असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही समस्या विद्यमान खासदरकडून सोडवण्यात आल्या नाहीत. या समस्या सोडवणार असल्याचे परांजपे म्हणाले. मतदारांना ठाण्यात १०० टक्के बदल हवा असल्याचे आनंद परांजपे यांनी सांगितले.