महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Karnataka Result Banner : 'कर्नाटका तो झाकी है महाराष्ट्र अभि बाकी है'; राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी - ठाण्यात राष्ट्रवादीकडून अभिनंदनाचे बॅनरबाजी

कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर ठाण्यात राष्ट्रवादीकडून अभिनंदनाचे बॅनरबाजी करण्यात येत आहे. कर्नाटका तो झाकी है महाराष्ट्र अभि बाकी है, असे घोषवाक्या बॅनरवर लिहण्यात आले आहे. कर्नाटकात काँग्रेसला 137 तर भाजपला 65 जागा मिळाल्या आहे. तर जेडीएसला 19 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Congress won majority In Karnataka
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिनंदनाचे बॅनर

By

Published : May 14, 2023, 5:44 PM IST

ठाण्यात राष्ट्रवादीकडून अभिनंदनाचे बॅनर

ठाणे : कर्नाटकाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस कडून जल्लोष साजरा करण्यात आला, तर ठाण्यात राष्ट्रवादी पक्षाकडून मनःपूर्वक अभिनंदनचे बॅनर लावण्यात आले आहेत. कर्नाटक तो झाकी है महाराष्ट्र अभी बाकी है. हा विजय महागाई विरोधात, विजय हुकूमशाहीच्या विरोधात, विजय जनतेचा, विजय लोकशाहीचा अशा प्रकारचे बॅनर राष्ट्रवादी पक्षाकडून राजा राजपूरकर यांच्यावतीने लावण्यात आले आहे. हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधत आहे. येणाऱ्या 2024 झाली नक्कीच भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही असे देखील राजा राजपूरकर यांनी सांगितले आहे.

काँग्रेसच्या विजयाचे कौतुक :कर्नाटकाच्या निकालानंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अशावेळी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील काँग्रेसच्या या विजयाचे कौतुक पोस्टर लावून केलेले आहे. यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत सर्वांचेच मनोमिलन झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकांमध्ये यांची चांगली परिणीती पाहायला मिळेल असा, आशावाद महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आहे.

काल देशभरात काँग्रेसकडून जल्लोष :काल आलेल्या पूर्ण बहुमताच्या निकालानंतर संपूर्ण देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला मात्र याचवेळी महाविकास आघाडी देखील या निकालामुळे आनंदी झाली आहे आणि त्यांना देखील महाराष्ट्रामध्ये बदल घडेल असा आशावाद आहे. कर्नाटकात काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. कर्नाटकात काँग्रेसला 137 तर भाजपला 65 जागा मिळाल्या आहे. 22 वर्षांनंतर कर्नाटकात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. या विजयानंतर देशभरात काँग्रेस जल्लोष करत आहे. इतर मित्रपक्षही काँग्रेसचे अभिनंदन करत आहेत.

  • हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details