ठाणे- कोरोनाचे सावट सर्वत्र पसरलेले असताना ठाण्यातून एक आनंदाची बातमी आल्याने इतर रुग्णांचीही हिंमत वाढणार यात शंकाच नाही. ठाण्यातील कौशल्या रुग्णालयात कोरोना बाधित एक रुग्ण गेले अनेक दिवस उपचार घेत होता. येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून अशक्य वाटणारे हे शिवधनुष्य पेलले. त्यांनी शक्य ते सर्व उपाय केल्याने आज हा रुग्ण बरा होऊन घरी परतला.
कोरोनावर मात केलेल्या रुग्णाचे कौशल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केले अभिनंदन - corona update thane
ठाण्यातील कौशल्या रुग्णालयात कोरोना बाधित एक रुग्ण गेले अनेक दिवस उपचार घेत होता. येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून अशक्य वाटणारे हे शिवधनुष्य पेलले. त्यांनी शक्य ते सर्व उपाय केल्याने आज हा रुग्ण बरा होऊन घरी परतला.
ठाणे
या रुग्णालयातून बरा होऊन परतणाऱ्या या पहिल्या रुग्णाचे अभिनंदन करण्यासाठी रुग्णालयातील सगळे डॉक्टर्स आणि कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांनी घरी जाणाऱ्या या रुग्णाचे टाळ्या वाजवून अभिवादन केले. कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर विजय मिळवून घरी परतणाऱ्या या रुग्णाने रुग्णालयातील सर्वांचे आभार मानले. कोरोना हा आजार बरा होतो, पण त्यासाठी योग्य औषधोपचाराची गरज असते, असे मत बरे झालेल्या रुग्णाने व्यक्त केले.
Last Updated : Apr 24, 2020, 8:58 PM IST