महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime : आमदाराच्या तोतया बहिणीचा पोलीस ठाण्यात गोंधळ; शिवीगाळ करत पोलिसांना धमकी - woman threat to Police

मी एका आमदाराची बहीण (MLA fake sister) आहोत. तुम्हाला सगळ्यांना बघू घेते, अशी धमकी या महिलेने रिक्षा चालकसह पोलिसांना पोलीस ठाण्यात धमकी (woman threat to Police) दिल्याची घटना घडली आहे. (Thane Crime) याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्रीती कपील त्रिभुवन (३२, रा. इंदिरानगर, कल्याण) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. (Latest news from Thane)

Confusion of Woman Thane
आमदाराच्या तोतया बहिणीचा पोलीस ठाण्यात गोंधळ

By

Published : Dec 23, 2022, 8:16 PM IST

ठाणे :रिक्षा चालक श्रीकांत मिश्रा हा बुधवारी कल्याण रेल्वे स्थानकासमोर प्रवाशांची वाट पाहत होता. त्याच सुमाराला प्रीती ही रिक्षा जवळ येऊन भाडे विचारात होती. यावरून दोघांमध्ये वाद होऊन भांडण झाले. त्यावेळी पोलीस घटनास्थळी येऊन त्या महिला व रिक्षा चालक दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर या महिलेने गोंधळ सुरु करून अतिशय संतप्त होऊन ती मारहाण करण्यास धावत होती. (Thane Crime) तर रिक्षा चालक पोलीस ठाण्यात उपस्थित होता. मिश्राची तक्रार करण्याऐवजी महिलेने (MLA fake sister) रिक्षा चालकाला फैलावर घेऊन तुझ्यामुळे मला पोलीस ठाण्यात यावे लागले. मला मनस्ताप झाला, असे ओरडून बोलू (woman threat to Police) लागली. अखेर पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. त्यावेळी पोलीस वाहनात बसताना या महिलेने पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. (Latest news from Thane)


महिलेचा गोंधळ एक तास भर सुरू :या महिलेला पोलिसांनी तिचे नाव विचारले तर ‘तुम्ही मला नाव विचारणारे कोण, तुमची लायकी आहे का मला काही विचारण्याची. तुम्ही मला शांत राहण्यास सांगणारे कोण’ असे अर्वाच्च भाषेतील प्रश्न उपस्थित करुन महिलेने महिला पोलिसांना मारहाण करण्यास धावणे, त्यांना शिवीगाळ केली आणि नखांनी बोचकारे घेतले. शिवाय रिक्षा चालकाला शिवीगाळ करणे असे प्रकार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या महिलेचा गोंधळ एक तास भर सुरू होता.


गुन्हा दाखल :दरम्यान, सरकारी कामात अडथळा निर्माण करून रिक्षाचालका मारहाण केल्या प्रकरणी महिला पोलीस शीला अंकुश बंदावणे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी प्रीती विरुध्द गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details