ठाणे -ठाण्यात हजारी विभागात राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर योजनेबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पालिकेकडून मंगळवारी येथील घरांवर नंबरींग करताना स्थानिकांनी विरोध केला. मात्र पालिका सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांनी विरोध करणाऱ्या रहिवाशांना पोलीस बळाचा वापर करून घरावर नंबर टाकण्याचे काम केले.
'आम्ही विकासाच्या विरोधात नाही; पण क्लस्टर योजना समजून सांगा' - home
ठाण्यात हजारी विभागात राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर योजनेबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पालिकेकडून मंगळवारी येथील घरांवर नंबरींग करताना स्थानिकांनी विरोध केला. मात्र पालिका सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांनी विरोध करणाऱ्या रहिवाशांना पोलीस बळाचा वापर करून घरावर नंबर टाकण्याचे काम केले.
या योजनेबाबत हाजुरी परिसरात प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. क्लस्टर योजनेची अंमलबजावणी ठाण्यात सुरु झाली असून महापालिकेच्यावतीने सर्व्हे सुरु करण्यात आला. हजारी विभागातील नागरिकांनी यापूर्वीच सर्व्हेला विरोध दर्शवून काम बंद पाडले होते. त्यानंतर मंगळवारी पालिका सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड हे पोलीस बंदोबस्तात हाजारी भागात जाऊन घरांवर नंबर टाकण्याचे काम सुरु केले. नागरिकांनी विरोध दर्शविल्यानंतर त्यांच्यावर पोलीस बाळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आम्ही विकासाच्या विरोधात नाही. पण क्लस्टर योजना आहे तरी काय? ती आम्हाला समजावून सांगा, अशी मागणी केल्यानंतर सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड हे रहिवाशांशी गुर्मीत अनेकवेळा मिटिंग झाल्याचे सांगून नंबरिंगची प्रक्रिया सुरु ठेवली. हजारी भागातील रहिवाशी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. अनेकवेळा मिटिंग झाल्याचे सांगत आहेत. पण मिटिंग मुलांसोबत केल्या आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पालिका प्रशासन क्लस्टरची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीसबळाचा वापर करून क्लस्टर योजना ही हाजुरीमधील नागरिकांवर लादण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.