महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जप्त केलेला 'तो' मावा भेसळयुक्त नव्हता; अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल - Food and Drug Administration thane

चार महिन्यांपूर्वी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई करत उल्हासनगरमधील शांतीनगर येथील गुरुदेव इंटरप्राईजेस या दुकानातून मावा जप्त केला होता. मात्र, तो जप्त केलेला मावा भेसळयुक्त नसल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Department) दिला आहे.

mava
जप्त केलेला मावा

By

Published : Feb 22, 2022, 7:13 PM IST

Updated : Feb 22, 2022, 7:50 PM IST

ठाणे - चार महिन्यांपूर्वी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई करत उल्हासनगरमधील शांतीनगर येथील गुरुदेव इंटरप्राईजेस या दुकानातून मावा जप्त केला होता. मात्र, तो जप्त केलेला मावा भेसळयुक्त नसल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Department) दिला असल्याची माहिती शिव- भिम मिठाई, मावा, खवा, ट्रान्सपोर्ट, चालक, मालक, व्यापारी, कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन व पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

माहिती देताना मावा संघटनेचे सचिव जयदीप सानप

चार महिन्यानंतर अहवाल आला समोर -

१ नोव्हेंबर २०२१ रोजी पोलिसांनी कारवाई करत मिठाई, स्पेशल बर्फी, मावा, खवा, विक्री करणारे घाऊक व्यापारी रवी खंडेलवाल यांच्या उल्हासनगरमधील गुरुदेव इंटरप्रायजेस येथे छापा टाकला. यावेळी नमुने अहवालासह लाखोंचा मावा जप्त करून कारवाई केली होती. तसेच नकली, बनावटी, तारीख उलटलेला, भेसळयुक्त अशी अनेक प्रकारची बतावणी करत नमुने कार्यवाही पूर्वीच बदनामी करण्यात आली होती. मात्र अन्न व औषध प्रशासन अधिकारी आय. एन. चिलवंते यांनी हा मावा भेसळयुक्त नसल्याचा अहवाल दिला असल्याची माहिती संघटनेचे सचिव जयदीप सानप यांनी दिली. यावेळी संघटनेचे संस्थापक शिवसेना नेते अरविंद मोरे, संघटना अध्यक्ष आरपीआय नेते सागर पगारे, संघटना उपाध्यक्ष लखपती राजपूत, पुरुषोत्तम खंडेलवाल, व्यापारी रवी खंडेलवाल, पंकज खंडेलवाल, राजा जाधव उपस्थित होते.

नाहक बदनामी करून आर्थिक नुकसान करू नका -

अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल प्राप्त होण्याआधीच काहींनी हा भेसळयुक्त मावा असल्याची बदनामी केली होती. मात्र, त्यावेळी जप्त केलेले नमुने अहवाल यात कोणतेही भेसळयुक्त, नकली, तारीख उलटलेला शरीरास अपायकारक नमुना नसून मानदे कायदे प्रमाणे प्रमाणित असल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. अशा प्रकारच्या खोट्या बदनामीमुळे व्यापारी दूध खवा उत्पादक शेतकरी पशू पालक यांचे नुकसान होत असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय कोणीही याबाबत बदनामी करू नये, असे आवाहन संघटनेचे सचिव जयदीप सानप यांनी केले आहे.

Last Updated : Feb 22, 2022, 7:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details