नवी मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी केली आहे. त्याच अनुषंगाने गरजूंना अन्नधान्याची मदत किंवा परिसरात निर्जंतुकीकरण किंवा फवारणी महापालिकेमार्फतच होणार असल्याचे पनवेल मनपाने आदेश दिले होते. मात्र, या आदेशाचे उल्लंघन केल्याने भाजप कार्यकर्त्यासह चौघांवर पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल परिसरात अवैधरित्या निर्जंतुकीकरण, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
गरजूंना अन्नधान्याची मदत किंवा परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी महापालिकेमार्फतच करण्याचे आदेश पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. मात्र, भाजप कार्यकर्ता हॅपी सिंग यांच्यासोबत इतर 4 जणांनी अवैधरित्या कामोठे परिसरात निर्जंतुकीकरण केले आहे.
लॉकडाऊनमध्ये संचारबंदी व जमावबंदीचे आदेश असूनही काही लोक रस्त्यावर उतरून भलतीच समाजसेवा करत आहेत. असाच पराक्रम पनवेलमधील भाजपचा कार्यकर्ता हॅपी सिंग याने केला आहे. गरजूंना अन्नधान्याची मदत किंवा परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी महापालिकेमार्फतच करण्याचे आदेश पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. मात्र, भाजप कार्यकर्ता हॅपी सिंग यांच्यासोबत इतर 4 जणांनी अवैधरित्या कामोठे परिसरात निर्जंतुकीकरण केले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या महाभागांनी कामोठे परिसरासोबतच कामोठे पोलीस स्थानकातदेखील निर्जंतुकीकरणाची फवारणी केली होती. संचारबंदीचे उल्लंघन केल्याने पनवेल मनपाच्या माध्यमातून कामोठे पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्ता हॅपी सिंग यांच्यासोबत इतर 4 जणांवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.