ठाणे - कलर्स (HD) चॅनेलवरील वरील 'खतरा खतरा' या एका टीव्ही शोमध्ये अभिनेत्री भारती सिंग हिने आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक आक्षेपार्ह वक्तव्य करत गैरकृत्य केल्याविरोधात मुरबाड पंचायत समितीच्या उपसभापती अरुणा रघुनाथ खाकर यांनी अभिनेत्री भारतीविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कलर्स (HD) चॅनेलवरील शोमध्ये संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून विचित्र अंगविक्षेप करत जातीवाचक अपशब्द वापरत समाजाची चेष्टा केल्याचा आरोप यावेळी तक्रादारांनी केला आहे. त्यामुळे आदिवासी समाजातर्फे त्यांच्या या कृत्याला आम्ही सर्व आदिवासी समाज म्हणून जाहीर निषेध करीत असून अभिनेत्री भारती सिंग हिच्या या गैरकृत्यामुळे आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट पसरल्याचे पाहवयास मिळत आहे.
हेही वाचा -खासदारांनी ही भाषा बोलणे किती योग्य? उच्च न्यायालयाने संजय राऊतांना खडसावले