ठाणे : पीडित संजयकुमार मुन्सीराम रामसह तिन्ही आरोपी अनेक महिन्यांपासून डोंबिवली नजीकच्या गोळवली गावातील शंकर शेठ चाळीतील एकाच खोलीत एकत्र राहतात. जखमी संजयकुमार आणि आरोपी सुरेंद्रकुमार हे दोघेही डोंबिवली एमआयडीसीतील जिमेन्सिटक कंपनीत कामाला आहेत. त्यातच संजयकुमार आणि तिन्ही आरोपींनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास राहत्या घरात दारूच्या पार्टीचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे रात्रीच्या सुमारास बाजारातून मासे आणि गावठी दारु खरेदी करून आणली. त्यानंतर चौघांनीही मिळून खोलीत जेवण तयार करून एकत्रित दारू पार्टी केली.
आधी लिंग कापले, मग् दवाखान्यात नेले :त्यानंतर आरोपी सोनुकुमारने संजयकुमारला सिगारेट आणण्यास सांगितले. तोपर्यत संजयकुमार घराबाहेर गेल्यानंतर आरोपींनी त्याला मारण्याचा कट रचला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. त्यातच रात्री १२ वाजेपर्यंत दारू पार्टी आटोपल्यावर सर्व जण एकाच खोलीत एकत्र झोपी गेले; मात्र रात्री एक वाजता आरोपी सोनुकुमारने दारूच्या नशेत संजयकुमार सोबत जुन्या कौटुंबिक भांडणाचा राग मनात ठेऊन भांडण सुरू केले. भांडण वाढत गेल्यानंतर सर्व आरोपींनी संजयकुमारला घट्ट पकडून ठेवले आणि सोनुकुमारने धारदार चाकूने संजयकुमारचे लिंग कापले. या भयानक घटनेनंतर संजयकुमारला रक्तस्त्राव सुरू झाल्याने आरोपींनी त्याला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.