महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime News : धक्कादायक! जेवण बनविण्याच्या वादातून सहकाऱ्याची हत्या; आरोपीस अटक

जेवण बनवण्याच्या वादातून दोन सहकाऱ्यामध्ये भांडण होऊन एका सहकाऱ्याने दुसऱ्या सहकाऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका भागातील एका कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर घडली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून हत्या करणाऱ्या सहकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

Thane Crime News
जेवण बनविण्याच्या वादातून सहकाऱ्याची हत्या

By

Published : Mar 9, 2023, 2:55 PM IST

जेवण बनविण्याच्या वादातून सहकाऱ्याची हत्या

ठाणे : पिजु जतिश बर्मन (वय २५) असे अटक केलेल्या आरोपी सहकाऱ्याचे नाव आहे. तर दीपक सुरेन बर्मन (वय ३५) असे दगडाने ठेचून हत्या झालेल्या सहकाऱ्याचे नाव आहे. यंत्रमाग उद्योग नगरी असलेल्या भिवंडी शहरात लाखो लाखो कामगार कामाच्या शोधात येऊन भिवंडीत कुटूंबासाठी उरधर्निवाह करत असतात. मूळचे पश्चिम बंगाल राज्यातील कुचबिहार जिल्ह्यातील दिनहाट गावातून रोजीरोटीच्या शोधात आरोपी पिजू हा आला होता.

एकत्र राहत होते :तो भिवंडीतील वंजारपट्टी भागातील जी. बी. सिथेंटिक्स हाऊस, या कारखान्यात मोलमजुरी करून इथेच असलेल्या बुबेरे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहत आहे. त्यातच त्याच्याच दिनहाट गावातून मृतक दीपक काही महिन्यापूर्वी रोजीरोटीच्या शोधात भिवंडीत आला होता. मृतक दिपकला आरोपी पीजुच्या ओळखीने त्यालाही कारखान्यात मोलमजुरी मिळाली होती. पिजू राहत असलेल्या खोलीत दोघेही एकत्र राहत होते. दरम्यान कारखान्यात मोलमजुरी करून आरोपी पिजू आणि मृत दीपक एकत्र खोलीत राहत होते.

निर्घृण हत्या केली : ८ मार्च रोजी बुधवारी रात्रीच्या सुमारास काम उरकल्यावर दोघेही खोलीत आले होते. त्यावेळी आरोपी पिजु याने मृत दीपक यास जेवण बनविण्यास सांगितले. मात्र दीपक याने आपणास जेवण बनविता येत नसल्याचे सांगत जेवण बनविण्यास नकार दिला. यावरून पिजु आणि दीपक यांच्यात खोलीतच बाचाबाची होऊन हाणामारी झाली. त्यानंतर पिजूला राग अनावर झाल्याने त्याने दगड घेऊन दीपक याची निर्घृण हत्या केली.



आरोपी ताब्यात : घटनेची निजामपुरा पोलीस ठाण्यात माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त, सुनील वडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत होते. त्याच वेळी घटनास्थळावरून फरार होण्याच्या तयारीत आरोपी पिजू लपून बसला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला घटनास्थळी ताब्यात घेतले. त्यानंतर दिपकचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केला. दरम्यान, मध्यरात्री उशिरा नारायण गिरधारीमल सोमाणी ( वय ६६) यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी पिजूला आज सकाळच्या सुमारास अटक केली. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार करीत आहेत.

हेही वाचा : Woman Murder on Women's Day : 'या' कारणामुळे केली पतीने पत्नीची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details