ठाणे- भाजपमध्ये मेगा भरती झाल्याने बंडखोरांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे भाजपने विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, विष्णू सावरा व माजी मंत्री एकनाथ खडसे या दिग्गज मंत्र्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. या पार्श्वभtमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्ता कट झालेल्या या भाजपच्या मंत्र्याच्या पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत.
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनासोबत 'कॉफी विथ युथ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भिवंडीत आले होते. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
डॉ. प्रमोद सावंत, गोवा मुख्यमंत्री हेही वाचा -डोंबिवलीत अल्पवयीन मुलीला डेंग्यूची लागण ! केडीएमसीच्या आरोग्य विभागाची धावपळ
तसेच या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्यामुळेच त्यांना तिकीट नाकारले का? यावर उत्तर देताना सावंत म्हणाले, महाराष्ट्रातील कुठल्याही मंत्र्याने भ्रष्टाचार केला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेले 4 दिवस मी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात फिरत असताना कॉफी विथ युथ या संवादत्मक कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा -दुचाकींच्या समोरासमोर धडकेत पोलीस हवलदारासह एकाचा मृत्यू
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साधलेल्या संवादादरम्यान राजकीय-सामाजिक, कार्यातील प्रेरणास्थान, आरक्षण, 370 कलम असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले असता त्यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री सावंत यांनी दिलखुलास उत्तरे दिली. याप्रसंगी खासदार कपिल पाटील, भाजपचे उमेदवार महेश चौगुले, जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील यांच्यासह विद्यार्थी व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.