ठाणे- एका घरातील फ्रिजमध्ये विषारी नाग दडून बसल्याची घटना कल्याण-पडघारोड वरील धुडखाडी गावातील एका घरातील किचनमध्ये घडली आहे. नाग दिसताच घरातील कुटंबाने घराबाहरे धूम ठोकले.
फ्रिजमध्ये निघाला विषारी नाग
भक्ष्याच्या शोधात विषारी-बिन विषारी सापांनी बदलत्या वातारणामुळे मानवी वस्तीत शिरकाव केला असून गेल्या 3 महिन्यात सर्पमित्रांनी कल्याण पश्चिमेकडील मानवी वस्तीतून शेकडो साप पकडून जंगलात सोडले. कालच सापर्डे गावात राहणारे दादाजी पाटील यांच्या भात शेतातील पेंड्यातून एक नव्हे तर 3 विषारी घोणस सर्पमित्रांनी पकडून त्यांना जीवदान दिले आहे.
हेही वाचा - बँकेला ३० कोटींचा चुना लावणाऱ्या जगदीश वाघचा उपचारादरम्यान मृत्यू
भिवंडी तालुक्यातील कल्याण - पडघा रोड वरील धुडखाडी गावात गणेश पाटील राहतात. त्यांच्या घरातील महिला फ्रिजमध्ये बुधवारी (दि. 25 डिसें) दुपारच्या सुमाराला काही साहित्य घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना फ्रिजच्या जाळीत अडकलेला नाग दिसतात त्यांनी घराबाहेर पळ काढला आणि घरातील इतर सदस्यांना नाग घुसल्याची माहिती दिली. त्यामुळे घरातील एकाही मंडळीची घरात जाण्याची हिंमत होत नव्हती.
अखेर वार संस्थेचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संर्पक करून गणेश यांनी दिली. माहिती मिळताच सर्पमित्र बोंबे यांनी घटनास्थळी येवून विषारी नागाला फ्रीजमधून शिताफीने पकडले. मात्र, हा नाग एवढा चपळ होता की पकडल्यानंतरही 2 वेळा सर्पमित्र बोंबे यांच्या तावडीतून सुटला होता. मात्र, त्याला पुन्हा पकडून सोबत आणलेल्या पिशवीत बंद केले. विषारी साप पकडल्याचे पाहून त्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास घेतला. दरम्यान, हा नाग अंत्यत विषारी इंडियन कोब्रा जातीचा असून 5 फूट लांबीचा आहे. या विषारी नागाला वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र बोंबे यांनी दिली.
हेही वाचा - भिवंडीत २१ लाखांचा बेकायदेशीर केमिकलसाठा जप्त; एकास अटक