ठाणे - कोरोनामुळे संपूर्ण देशात २१ दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे भीक मागून जगणाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, अशा लोकांसाठी आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशानुसार सहआयुक्त मारुती गायकवाड हे धावून आले असून त्यांनी सर्वांची सोय महापालिकेच्या मालकीच्या काही इमारतीमध्ये केली आहे.
ठाण्यातील भिकाऱ्यांच्या मदतीला धावले महापालिका प्रशासन... उपासमारी टळली - कोरोना अपडेट
ठाणे रेल्वे परिसरात शेकडो भिकारी राहतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. तसेच त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका देखील अधिक आहे. त्यामुळे आयुक्त सिंघल यांच्या आदेशानुसार कोपरी नौपाडा प्रभागाचे सहआयुक्त मारुती गायकवाड हे अशा बेघर असलेल्यांच्या मदतीला धावले
ठाणे रेल्वे परिसरात शेकडो भिकारी राहतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. तसेच त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका देखील अधिक आहे. त्यामुळे आयुक्त सिंघल यांच्या आदेशानुसार कोपरी नौपाडा प्रभागाचे सहआयुक्त मारुती गायकवाड हे अशा बेघर असलेल्यांच्या मदतीला धावले. त्यांनी टीमटीच्या चार विशेष बसमधून सर्वांना ठाण्यातील दादोजी कोंडदेव मैदानात नेले. काहींच्या राहण्याची सोय महापालिकेच्या मालकीच्या इमारतींमध्ये केली, जेणेकरून त्यांना कोरोनाची लागण होणार नाही. याठिकाणी त्यांना स्वच्छ बाथरुम व प्रसाधनगृहांची सुविधा मिळेल. त्यामुळे रोगाच्या प्रसाराची साखळी तोडण्यात त्यांना यश मिळाले. काही सामाजिक संस्था आणि महापालिकेच्या माध्यमातून सर्वांच्या जेवण-खाण्याची व्यवस्था करणार असल्याचे सहआयुक्त गायकवाड यांनी सांगितले. तसेच ठाणे महापालिका कोणत्याही व्यक्तीला उपाशीपोटी झोपू देणार नाही. तसेच प्रत्येकासाठी घर आणि जेवणाची व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.