ठाणे - राज्यात राजकीय नेत्यानंतर त्यांचे निकटवर्तीय केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केली ( Cm Uddhav Thackeray kin Shridhar Patankar ) आहे. ठाण्यातील वर्तक नगर परिसरात असणाऱ्या 11 सदनिकांवर आणि अन्य मालमत्तांवर ईडीने जप्त केल्या आहेत. त्यानंतर आता श्रीधर पाटणकर यांच्या अन्य मालमत्ताही ईडीच्या रडारवर ( Shridhar Patankar Other Properties Radar ED ) आहेत.
'ईटीव्ही भारत'ने श्रीधर पाटणकर यांचा मालमत्तांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात ठाण्यातील पाचपखाडी परिसरातील पाचपखाडी ज्वेलर्स प्रकल्प पाटणकर यांच्या भागीदारीमध्ये असल्याचे समोर आले आहे. श्रीधर पाटणकर यांनी या प्रकल्पात करोडो रुपये देऊन भागीदारी केलेली आहे. हा प्रकल्प तीन भागीदारांमध्ये असून, त्यामध्ये श्रीधर पाटणकर यांचा देखील समावेश आहे.