महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डीआयजी मोरे प्रकरणाला नवे वळण; पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांचा ड्रायव्हर सांगून धमक्या - cm driver dinkar salave

पुण्याचे पोलीस महानिरीक्षक निशिकांत मोरे यांनी एका मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ड्रायव्हर आहे, असे सांगून पीडितेच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांना केला आहे. याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे.

DIG nishikant more case
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jan 9, 2020, 12:12 PM IST

Updated : Jan 9, 2020, 12:31 PM IST

नवी मुंबई - पुण्याचे महानिरीक्षक निशिकांत मोरे यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दिनकर साळवे या व्यक्तीकडून मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रायव्हर आहे, असे सांगून समोरासमोर आणि फोनवरून धमकी दिल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडील व भावाने केला आहे. तसेच संबधित प्रकरणामुळे पीडिता घर सोडून निघून गेली होती, असाही आरोप त्यांनी केला. अद्यापही तिचा शोध लागत नसल्याने पीडित मुलीचे कुटुंब प्रंचड तणावाखाली आहे.

डीआयजी मोरे प्रकरणाला नवे वळण; पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांचा ड्रायव्हर सांगून धमक्या

पुणे मोटर ट्रान्सपोर्ट विभागाचे पोलीस महानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणारी अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली आहे. मुलीने घर सोडण्यापूर्वी रेल्वेखाली जाऊन आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहली होती. या चिठ्ठीमध्ये पीडितेने संबंधित प्रकरणात मला प्रचंड मानसिक त्रास होत असून "माझ्या आत्महत्येस डीआयजी निशिकांत मोरे हेच, जबाबदार आहेत'', असे लिहिले होते.

हे वाचलं का? - अल्पवयीन मुलीचे विनयभंग प्रकरण : 'त्या' पोलीस अधिकाऱ्याच्या दबावामुळे पीडितेने घर सोडले

पोलिसांचे ५ पथक पीडित मुलीचा शोध घेत आहेत. मात्र, अजूनही मुलगी सापडली नसून पोलीस अंत्यत धीम्या गतीने तपास करीत आहेत, असा आरोप मुलीच्या पालकांनी केली आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबाला ‘मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरच्या नावे’ धमक्या येत असल्याचाही आरोप पीडितेच्या भावाने केला आहे.

दिनकर साळवे, असे धमकी देणाऱ्या ड्रायव्हरचे नाव आहे. साळवे हा या अगोदर निशिकांत मोरेंच्या गाडीचा ड्रायव्हर होता. मंगळवारी पीडित मुलीचे वडील व भाऊ न्यायालयात गेले असता तेथे निशिकांत मोरे यांच्या पत्नीसोबत दिनकर साळवेही आला होता. त्याने न्यायालय परिसरात "मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ड्रायव्हर आहे'', असे सांगून पीडितेच्या वडिलांना धमकी दिली असल्याचे पीडितेच्या वडिलांनी सांगितले आहे. याप्रकरणी मुलीच्या भावाने तळोजा पोलीस ठाण्यातही तक्रार केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयात दिनकर साळवे हा पोलीस दलात कार्यरत आहे. सद्यस्थितीत तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीवर ड्रायव्हर असून गेल्या पाच ते सहा दिवसापासून तो कामावरच आला नसल्याचेही मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

नक्की काय झाले होते -

गेल्या 5 जून 2019 ला पीडित मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. यावेळी पोलीस महानिरीक्षक निशिकांत मोरे यांनाही आमंत्रित केले होते. वाढदिवस साजरा करताना भावाने तिच्या चेहऱ्यावर केक लावला. तिच्या चेहऱ्यावर लागलेला केक मोरे यांनी जिभेने चाटला होता. मोरेंच्या पत्नीनेच याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि ती हा व्हिडिओ पीडित मुलीच्या पालकांना पाठवून त्रास देत होती. शिवाय हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता, असे आरोपी पीडितेच्या कुटुंबीयांनी केले आहेत. यामुळे पीडित मुलीने डीआयजी मोरेंविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करू नये म्हणून पीडितेच्या कुटुंबीयांना विविध प्रकारे धमक्याही दिल्या जात होत्या.

अखेर 6 महिने उलटून गेल्यावर काही दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या हस्तक्षेपानंतर मोरे यांच्यावर पोक्सोअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून महानिरीक्षक निशिकांत मोरे फरार झाले आहेत. पोलीस मोरेंचा शोध घेत आहेत. पोलीस महानिरीक्षक मोरे हे पोलिसांत उच्चपदस्थ अधिकारी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास हयगय करीत आहे, असाही आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे.

Last Updated : Jan 9, 2020, 12:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details