ठाणे: दोन वर्षांपासून इतर सणांप्रमाणेच गुढी पाडव्यावर तसेच शोभायात्रांवर करोनाचे सावट होते. त्यामुळे सण साजरे करता आले नाही. परंतु आज राज्याच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा होत आहे. अनेक भागांमध्ये शोभायात्रा काढण्यात येत आहे. दरवर्षी ठाण्यात गुढीपाडव्यानिमित्त गोपीनेश्वर मंदिर न्यास येथे मोठ्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. या शोभायात्रेमध्ये ठाण्यातील अनेक सामाजिक संस्था, पालिका प्रशासन, महिला, सामाजिक कार्यकर्ते, नेतेमंडळी सहभागी होत असतात. कोरोना नंतर होणाऱ्या या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंदा नागरिकांनी सहभागी झाले आहेत. सकाळपासूनच या शोभायात्रेची सुरुवात झाल्यावर नागरिकांनी रांगोळ्या काढून या शोभायात्रेचे स्वागत केले आहे.
मुख्यमंत्री यात्रेत सहभागी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्याच वेळी गुढी पाडव्याच्या स्वागत यात्रेत सहभागी झाले आहेत. कोळीनेश्वर देवस्थान जांभळी नाका येथून सुरू झालेल्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून स्वागत यात्रेची सुरुवात केली. त्यानंतर ते स्वःत जांभळी नाका, टेम्भी नाका चरई ते हरिनिवास सर्कल पर्यन्त स्वागत यात्रेत सहभागी झाले. यादरम्यान त्यांच ठाणेकरांनी स्वःगत केले तर मुख्यमंत्री यांनी सुद्धा ठाणेकरांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.