ठाणे :एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची उभी प्रतिकृती असलेल्या केकची ठाण्यात विशेष मागणी आणि खास मेजवाणीची चर्चा गुरवारपासून रंगली आहे. हा केक कसा दिसतो, हे केक पाहिल्यावरच समजते. गुरुवार सकाळपासूनच राज्यभरातील अनेक लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात येत होते. ९ फेब्रुवारी म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा दिवस समजला जातो. कारण त्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असतो. गुरुवारी मुख्यमंत्री पुन्हा शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा पहिलाच वाढदिवस असल्याने आपल्या नेत्याच्या वाढदिवसासाठी नेते आणि कार्यकर्ते सज्ज झाले होते.
मुख्यमंत्र्यांची एक विशेष प्रतिकृती : केकवर लावण्यासाठी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत विराजमान झालेली मुख्यमंत्र्यांची एक विशेष प्रतिकृती बनवून घेण्यात आली. ठाण्यातील स्वीट काऊंटी या दुकानाने ऑर्डरप्रमाणे ही प्रतिकृती बनवली होती. ज्यांना गरज पडेल त्यांनी ती न्यावी, असे आवाहन त्यांनी केले होते. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला असंख्य कार्यकर्ते नेते आणि नागरिकांनी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. याचा आपल्याला आनंद तर आहेच, परंतु त्याहीपेक्षा अनेक समाज उपयोगी प्रकल्पांचा आपण लोकार्पण केल्याचा आनंद जास्त असल्याचे मनोगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. गुरुवारी सामान्य नागरिकांसाठी गोरगरिबांसाठी आणि दिव्यांगांसाठी अनेक योजनांचे घोषणा केल्या. तसेच आपला आनंद द्विगुणित झाल्याचे मनोगत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
हुबेहूब दिसणाऱ्या केकमुळे मागणी जास्त :केक बनवण्यासाठी घेतलेल्या विशेष मेहनतीमुळे हा केक एकनाथ शिंदे यांची हुबेहूब आकृती वाटत होता. म्हणूनच या केकची मागणी देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाढली. पुढील वर्षी अशाच प्रकारे वेगवेगळ्या आकारातील प्रतिकृती बनवण्यात येईल, असे यावेळी व्यावसायिकांनी सांगितले आहे. ठाण्यातील बाळासाहेबांची शिवसेना स्वा. सावरकर नगर आयोजित आगळ्यावेगळा उपक्रम गुरूवारी हाती घेण्यात आला होता.