महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jitendra Awhad: आव्हाड यांच्याबाबत धमकीची ऑडियो क्लिप व्हायरल, कार्यकर्त्यांकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याच्या नियोजनाची क्लिप वायरल झाली आहे. आव्हाडांच्या कुटुंबियांना संपविण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याचा त्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. ठाणे महानगर पालिकेतील सहायक आयुक्त महेश आहेर यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जात आहे. सदरची क्लिप व्हायरल होताच राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी संध्याकाळी मुख्यालयाच्या बाहेर आलेल्या सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना बॉडीगार्ड, पोलीस यांच्या समोर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Death threat to Jitendra Awad family
जितेंद्र आव्हाड

By

Published : Feb 15, 2023, 7:19 PM IST

Updated : Feb 16, 2023, 7:24 AM IST

जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याच्या नियोजनाची क्लिप

ठाणे:महाराष्ट्रातून आताच्या क्षणाची सर्वाता मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याच्या नियोजनाची क्लिप वायरल झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलगी आणि जावयावर गोळी झाडण्याची धमकी देण्यात आली आहे. स्पेनमध्ये मारेकरी तयार ठेवल्याचे रिकॉर्डींगमध्ये उल्लेख आहे.

आव्हाडांच्या कुटुंबियांना संपविण्याची धमकी:जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियांना संपविण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले आहेत, असा दावा क्लिपमध्ये करण्यात आला आहे. ही व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप ठाणे महानगर पालिकेतील अधिकारी महेश आहेर यांची असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे.

आव्हाडांच्या समर्थकांकडून सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण

महेश आहेर यांना मारहाण: जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना धमकी देणाऱ्या व्हारल ऑडिओ क्लिपमध्ये सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे आज जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी महेश आहेर यांना मारहाण केली. ठाणे महानगर पालिकेच्या गेटवरच आव्हाडांच्या समर्थकांनी सहायक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली. दरम्यान, यावेळी सुरक्षा रक्षकांनी बंदूक काढल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या मारहाण प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड प्रतिक्रिया व्यक्त करताना

जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया: माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी टीव्हीवर माझ्या कुटुंबियांबद्दल धमकी दिल्याची क्लिप पाहिली. माझ्या मुलीला स्पेनमध्ये मारणार आहेत. त्यासाठी बाबाजी नावाचा शूटर असणार आहे. या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही. मी माझ्या कुटुंबीयांची सुरक्षा करण्यासाठी समर्थ आहे. आता जी क्लिप व्हायरल झाली आहे मी याबाबत कुठेही तक्रार करणार नाही. कारण कारवाई होणारच नाही. त्यामुळे आता पोलिसांनीच बाबाजी कोण याचा शोध घ्यावा असे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

क्लिपमध्ये काय म्हटलंय? : ठाणे पालिकेतील प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण वायरल झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे. ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि समोरच्या व्यक्तीच्या ऑडिओ किल्पमध्ये जीवे ठार मारण्याच्या गंभीर षड्यंत्राचा उलगडा होत असल्याचे सांगितले जात आहे. आव्हाडांची कन्या आणि जावई यांच्या गेमचे षडयंत्र रचल्याचे आणि माझ्यावर काही येऊ नये म्हणून मी सीन क्रिएट केल्याचे स्पष्ट संभाषण व्हायरल झाले. एकीकडे महेश आहेर असले तरीही दुसऱ्या बाजूला संभाषण करणारा व्यक्ती कोण ? याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. क्लिपमध्ये तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूरच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा:Hearing on Shiv Sena: राज्यातला सत्ता संघर्ष! सुनावणी सत्र सुरूच, उद्या शिंदे गट बाजू मांडणार

Last Updated : Feb 16, 2023, 7:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details