महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वच्छतेसाठी शिवसैनिकाची धडपड; स्वखर्चाने राबवतायत स्वच्छता मोहीम - स्वच्छ भारत

या उपक्रमासाठी पालिकेकडून घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात रात्री स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे कल्याण उपशहर प्रमुख किशोर शुक्ला यांनी दिली.

cleanliness drive
स्वच्छतेसाठी शिवसैनिकाची धडपड; स्वखर्चाने राबवतायत स्वच्छता मोहीम

By

Published : Feb 24, 2020, 12:07 PM IST

Updated : Feb 24, 2020, 12:53 PM IST

ठाणे - 'स्वच्छ टिटवाळा सुंदर मांडा' असा संदेश देऊन टिटवाळ्यातील शिवसेनेचे कल्याण उपशहर प्रमुख किशोर शुक्ला स्वखर्चाने साफसफाईसाठी मजूर लावून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी धडपड करीत आहेत. पालिका प्रशासनाच्या घन कचरा विभागाकडून या परिसरातील कचरा उचलण्यास दिरंगाई होत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

स्वच्छतेसाठी शिवसैनिकाची धडपड; स्वखर्चाने राबवतायत स्वच्छता मोहीम

या स्वच्छता मोहिमेचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परिसरात स्वच्छता मोहिमेसह वृक्षारोपण कार्यक्रमदेखील हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी पालिकेकडून घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात रात्री स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल, अशी माहिती यावेळी किशोर शुक्लांनी दिली.

हेही वाचा -'इंडियन आयडॉल 11 ' चा विजेता ठरला भटिंडाचा सनी हिंदुस्तानी

घरातील कचरा ओला आणि सुका असा विभागून महापालिकेच्या घंटागाडीत टाकावा, असे आवाहन यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले. निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Last Updated : Feb 24, 2020, 12:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details