महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Clash Between Two Groups : हळदी सभारंभात नाचताना धक्का लागल्याने दोन गटात राडा, चार जण गंभीर जखमी - नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे येथे लग्नाच्या हळदी कार्यक्रमात डीजेच्या गाण्यावर नाचताना धक्का लागल्याने, दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यावेळी झालेल्या हाणामारीत चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Clash Between Two Groups
दोन गटात राडा

By

Published : May 22, 2023, 6:48 PM IST

ठाणे: लग्नाच्या हळदी सभारंभात डीजेच्या तालावर नाचताना धक्का लागल्याने दोन गटात धारदार शस्त्र, लोखंडी रॉड, फरशीने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील अंजूर फाटा येथील साठे नगरमधील एका लग्न मंडपात घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन जाधव (२१), कैलास धोत्रे (३५), दिनेश मोरे (१८), संदीप उदमेले उर्फ डुबऱ्या (२४), राजू गुंजाळ ( सर्व रा.साठेनगर भिवंडी ), संजय जाधव,अक्षय जाधव (दोघे रा.फेणेगाव,कामतघर) अशी परस्परविरोधी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर संजय जाधव, अक्षय जाधव, दिनेश मोरे व अजय चव्हाण, अशी जोरदार राड्यात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

डीजेच्या तालावर नाचवत असताना राडा :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी संजय जाधव याच्या नातेवाईकाकडे हळदी सभारंभ २० मे रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास अंजूर फाटा परिसरातील साठेनगर येथील वडारवाडी, येल्लमा मंदिराच्या पुढे मंडपात होता. त्यावेळी संजय हा त्याचे मित्र अक्षय आणि राजू यांच्या सोबतीने हळदी सभारंभाला आला होता. याच दरम्यान परिसरात हळदीचा कार्यक्रम असल्याने दुसऱ्या गटातील दिनेश हा त्याचे मित्र लखन, कैलास, संदीप यांच्यासोबत आला होता. यावेळी हळदीनिमित्ताने बँड आणि डीजेच्या तालावर काही तरुण नाचवत होते.

रुग्णालयात उपचार सुरू: या हळदीच्या नाचगाण्याच्या रंगात सर्वजण नाचत असतानाच, लखन आणि संजय यांचा नाचत असतानां एकमेकांना धक्का लागला. त्यामुळे वाद होऊन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दिनेशच्या आत्यालाही विरोधी गटातील संजय आणि अक्षयने शिवीगाळ केली. त्यानंतर या भांडणाचे रुपांतरण हाणामारीत झाले. या झालेल्या धुमश्चक्रीत धारदार शस्त्र, लोखंडी रॉड, फरशीने दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये संजय, अक्षय, दिनेश आणि अजय हे चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घटनेचा पुढील तपास पोना तडवी करीत आहेत.

हळदी समारंभात प्राणघातक हल्ला:यापूर्वीही एका लग्नाचा हळदी समारंभ सुरु असतानाच लुटमारीच्या इराद्याने घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी तिघांवर प्राणघातक हल्ला केला. हि धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात २१ फेब्रुवारी २०२१ रोजी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. या हल्ल्यात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सुवर्णा चिंतामण घोडे असे प्राणघातक हल्ल्यात मृत महिलेचे नाव आहे. तर भारती जगदीश म्हात्रे आणि पवन जगदीश म्हात्रे हे दोघेजण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -

  1. Mumbai Ram Navami Clashes मालाड परिसरात रामनवमी शोभायात्रेदरम्यान हाणामारी २० जणांना अटक ३०० हून अधिक जणांविरूद्ध गुन्हा
  2. Mumbai Bhivandi Crime News पाण्याच्या वादातून शेजारी बनले पक्के वैरी हाणामारीत एकाचा मृत्यू तर दुसरा तुरुंगात
  3. Police Firing जालन्यात दोन गटात राडा पोलिसाचा हवेत गोळीबार हाणामारीत तीन जण गंभीर जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details