महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jameel Sheikh Murder: राबोडी जमील शेख हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात - जमील शेख हत्याकांड

Jameel Sheikh Murder: ठाण्याच्या राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २३ नोव्हेंबर, २०२० रोजी भर बाजारात दुचाकीवरून जाणार्‍या मनसे प्रभाग अध्यक्ष आणि आरटीआय कार्यकर्ता जमील शेख यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. घटनेतील आरोपींपैकी दोन आरोपी शहीद शेख आणि इरफान सोनू शेख यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. राबोडी हत्येतील तिसरा आरोपी हबीब अजमईन शेख (३६) याला रविवारी पोलिसांनी अटक केल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी माहिती दिली.

Jameel Sheikh Murder
जमील शेख

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 9:01 PM IST

ठाणेJameel Sheikh Murder:राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदुपारी गजबजलेल्या परिसरातून मृतक जमील शेख हा दुचाकीवर मागे बसून प्रवास करीत असताना त्याच्या मागोव्यावर असलेल्या दोघा आरोपींपैकी दुचाकीच्या मागे बसलेल्या आरोपीने बंदुकीतून अगदी जवळून जमील शेख याच्यावर गोळीबार करून हत्या केली होती. यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाल्याची घटना २३ नो्व्हेंबर, २०२० रोजी घडली होती. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून हेल्मेट परिधान करून दुचाकी चालविणार्‍या शहीद शेख याला २५ नोव्हेंबर २०२० रोजी पोलिसांनी अटक केली. तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे असल्याचे कळले होते. या माहितीवरून युपी एसटीएफ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत आरोपी इरफान सोनू शेख याला ३ एप्रिल, २०२१ रोजी अटक केली होती.

तिसऱ्याही आरोपीला ठोकल्या बेड्या:घटनेतील तिसरा आरोपी ओसमा शेख अद्याप फरार आहे. दोन आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूच होता. दरम्यान पोलिसांच्या तपासात जमील शेख हत्येत सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने आरोपी हबीब अजमईन शेख (36, रा. राबोडी ठाणे) याला रविवारी (२४ सप्टेंबर) रोजी अटक केली. मनसे प्रभाग अध्यक्ष आणि माहितीचा अधिकार कार्यकर्ता मृतक जमील शेख हत्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर चौथ्या फरारी सुपारी किलर ओसमा शेख याचा शोध अद्याप पोलीस घेत आहेत.


२ लाखाची सुपारी:ठाणे गुन्हे शाखा आणि युपी एसटीएफ पथकाच्या संयुक्त कारवाईत राबोडी जमील शेख हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी इरफान सोनू शेख याला लखनऊ येथून ३ एप्रिल, २०२१ रोजी अटक केली. त्याच्या अधिक चौकशीत त्यांना ओसमा शेख याने सुपारी दिल्याचे समोर आले. मृत जमील शेख याच्या हत्येची सुपारी ओसमा शेख याने आरोपी शाहीद आणि इरफान यांना देऊन हत्याकांड घडविले. हत्या करणारे दुचाकीवरील चालक आणि गोळीबार करणारे दोन आरोपी अटक झाले. तर सुपारी घेणारा मुख्य आरोपी ओसमा अद्याप फरारीच आहे. तर दुसरीकडे या हत्येत सहभाग असलेला तिसरा आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

मुख्य आरोपी अद्याप फरारच:अद्यापही एक महत्त्वाचा आरोपी ओसमा शेख अद्याप फरारी आहे. त्याच्या अटकेनंतर अनेक प्रश्नांचा उलगडा होणार आहे. हत्येच्या मागचे निश्चित कारण स्पष्ट होणार आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचं हत्येची २ लाखाची सुपारी दिली कुणी? या महत्त्वाच्या प्रश्नाचा उलगडा होणार आहे. मृतक जमील शेख याची हत्या राजकीय कारणावरून झाल्याची चर्चा राबोडी परिसरात होता. आता तिसरा आरोपी तीन वर्षांनंतर अटक केल्यानंतर पुन्हा एकदा जमील शेख हत्या प्रकरणाच्या चर्चेला उधाण आलेले आहे. तर गुन्हे शाखा मात्र चौथ्या सुपारीबाज आरोपी ओसमा शेख याच्या शोधात आहे.

हेही वाचा:

  1. Jalna Crime News: बकऱ्या चोरी करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरानं केल धक्कादायक कृत्य, एक जण ताब्यात
  2. Suspected Ghost : अघोरी प्रकार! भूत असल्याच्या संशयातून महिलेला मारहाण, स्मशानातील राख लावली खायला, गुन्हा दाखल
  3. Family Dispute Crime : कौटुंबिक वादातून नागपुरात नवऱ्यानं केली बायकोची हत्या; तर बी़डमध्ये बापानं मुलावर अन् पत्नीवर केले वार

ABOUT THE AUTHOR

...view details