ठाणे - राज्यातील सरकार स्थिर असून अब्दुल सत्तार यांच्याविषयी अफवा पसरवून विरोधी पक्ष गुंतागुंत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राज्याचे नवनियुक्त नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यावेळी, त्यांनी महत्वपूर्ण खाते दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभारही व्यक्त केले.
'अब्दुल सत्तारांविषयी अफवा पसरवून विरोधी पक्ष गुंतागुंत निर्माण करण्याच्या प्रयत्नात' - अब्दुल सत्तार
विरोधी पक्षाकडे दुसरा विषय नसल्याने अब्दुल सत्तार यांच्याविषयी अफवा पसरवून ते केवळ गुंतागुंत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राज्याचे नवनियुक्त नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आपल्या खात्याविषयी बोलताना त्यांनी मेट्रो, वाहतूककोंडी यांसारख्या विषयांवर काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे
हेही वाचा -कालच शिवसेनेत आले, मंत्रीपद मिळाले तरीही नाराजी कशाला; गुलाबराव पाटलांचा सत्तारांना टोला
मातोश्रीवर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना सुरक्षा रक्षकांनी रोखल्याप्रकरणी बोलताना शिंदे म्हणाले, "महाविकास आघाडीचे सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. कर्जमाफीच्या बाबतीत बँकांसोबतच सरकारी यंत्रणेलादेखील आदेश देण्यात आले आहेत" आपल्या खात्याविषयी बोलताना त्यांनी मेट्रो, वाहतूककोंडी यांसारख्या विषयांवर काम करणार असल्याचे स्पष्ट केले.