ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत गटाराच्या मॅनहोलमध्ये पडलेल्या महिलेचा नागरिकांनी वाचवला जीव - thane women news

भिवंडी तालुक्यातील काल्हेर - ठाणे मार्गावर असलेल्या पूर्णा येथील पेट्रोल पंपाबाहेर रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. रस्त्यालगतच एक महिला पाण्यातून वाट काढत होती. त्याचवेळी रस्त्याने जात असताना ही महिला मोठ्या मॅनहोलमध्ये पडून पाण्यात बुडत असल्याचे नागरिकांना दिसले. यावेळी नागरिकांनी महिलेला बाहेर काढले.

Citizens rescued a woman who fell into a manhole in Bhiwandi
भिवंडीत गटाराच्या मॅनहोलमध्ये पडलेल्या महिलेचा नागरिकांनी वाचवला जीव
author img

By

Published : Jun 18, 2021, 11:00 PM IST

ठाणे -जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने गुरुवारी (दि.17 जून) दुपारी जोरदार हजेरी लावली होती. या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहर व ग्रामीण भागातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी जमा झाल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते. भिवंडी तालुक्यातील पूर्णा रस्त्यावरील एका मोठ्या गटाराच्या मॅनहोलमध्ये अचानक एक महिला पडल्याची घटना उडकीस आली आहे. त्या महिलेला नागरिकांनी तिला सुखरूप बाहेर काढून तिचा जीव वाचवला आहे.

भिवंडीत गटाराच्या मॅनहोलमध्ये पडलेल्या महिलेचा नागरिकांनी वाचवला जीव

कारमधून काढलेल्या व्हिडीओमुळे घटना आली समोर

भिवंडी तालुक्यातील काल्हेर - ठाणे मार्गावर असलेल्या पूर्णा येथील पेट्रोल पंपाबाहेर रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. रस्त्यालगतच एक महिला पाण्यातून वाट काढत होती. त्याचवेळी रस्त्याने जात असताना ही महिला मोठ्या मॅनहोलमध्ये पडून पाण्यात बुडत असल्याचे नागरिकांना दिसले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी महिलेला वाहून जाण्याचा अगोदरच सुखरूप बाहेर काढले आहे. तर, दुसरीकडे कारमधील एका व्यक्तीने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत करून या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना सावध करण्यासाठी त्याने व्हायरल केले. सध्या ही महिलेच्या सुखरूप असून तिच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा - अमरावती : सुनील देशमुखांचा काँग्रेसी विचार संधीसाधू; भाजपाची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details