ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लुईस वाडी परिसरात निवासस्थान आहे. या निवासस्थानातील परिसरात नागरिकांना उपद्रव करणाऱ्या लोकांमुळे त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे. दिवसभरात कोणत्याही वेळी लुईस वाडी परिसरामध्ये गरदुल्यांची असलेली गर्दी होणारा धूर यामुळे लुईसवाडी भागातील नागरिक त्रासलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारीच गर्दुल्ल्यांचा होणारा हा त्रास काही केला थांबत नसल्यामुळे या परिसरात राहणाऱ्या लहान मुले महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना आता मुख्यमंत्र्यांना विनंती करण्याची वेळ आलेली आहे.
मागणीसाठी नागरिक रस्त्यावर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थान परिसरात अनेक डझन पोलिसांचा संरक्षण आहे. दरम्यान, असे असले तरीही या परिसरात होत असलेल्या अवैध कामांवर पोलिसांना नियंत्रण ठेवता आलेले नाही. या संपूर्ण प्रभागातच लुईस वाडी हजुरी, पाईपलाईन रोड, वागळे इस्टेट या भागात अमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन शेकडो युवक करत आहेत. आणि या संपूर्ण प्रकाराला रोखण्यासाठी होणारी पोलिसांची कारवाई देखील नगण्य असल्यामुळे आता अनेक वर्षांचा पत्र व्यवहार केल्यानंतर नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागला आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा : नागरिकांनी याबाबत ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थान परिसरात काही ठराविक ठिकाणी दिवसभर चरस गांजा हे पदार्थ विकले जातात. त्यासाठी ठाण्यातील विविध भागातून युवक या भागात येतात. अंमली पदार्थ विकत घेतल्यानंतर ते त्याच ठिकाणी देखील त्याचा सेवन करतात आणि यामुळेच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा भांडणांचा हाणामाऱ्यांचा सामना देखील करावा लागतो. पोलिसांनी जर योग्य वेळीच कठोर कारवाई केली नाही तर यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.