ठाणे- येथील सहयोग मंदिर सभागृह येथे सुरू असलेल्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील छायाचित्रे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
ठाण्यात विविध अभयारण्यातील फोटो प्रदर्शनाला नागरिकांची गर्दी - सहयोग मंदिर सभागृह
ठाणे येथील सहयोग मंदिर सभागृह येथे सुरू असलेल्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील छायाचित्रे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
वाईल्ड विजन्स या संस्थेचे हे पहिलेच वर्ष आहे. वाईल्ड व्हिजन्स या संस्थेच्या वतीने आज वाईल्ड लाईफ फोटोग्राफीवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स मागवण्यात आले होते. राज्याच्या विविध भागातून अनेक छायाचित्रकारांनी या आवाहनाला प्रतिसाद देत ७५० पेक्षा अधिक छायाचित्र या प्रदर्शनासाठी पाठवले आहे .
त्यातील निवडक २०० छायाचित्र या प्रदर्शनात प्रदर्शीत करण्यात येणार आहेत. एकंदर १२१ छायाचित्रकारांची ही छायाचित्रे आहेत. भारतातील काझीरंगा, रणथंबोर, जीम कोरबेट, पेंच, कान्हा, ताडोबा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या आणि इतरही जंगलांमध्ये भटकंती करताना छायाचित्रकारांनी टिपलेले अनेक उत्तमोत्तम छायाचित्र बघण्याची संधी यानिमित्ताने ठाणेकर नागरिकांना मिळणार आहे. तसेच या प्रदर्शनाचे उद्घाटन ख्यातनाम छायाचित्रकार महेश लिमये यांच्या हस्ते झाले. ११ ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या कालावधीत सहयोग मंदिर सभागृह येथे सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.