ठाणे- अंबरनाथच्या शिधावाटप कार्यालयाबाहेर शिधावाटप कार्डची होळी करत नागरिकांनी सोमवारी आंदोलन केले. शिधावाटप कार्डावर मिळणाऱ्या धान्याचा अपहार होत असल्याच्या आरोप करत त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिधावाटप अधिकारी, दुकानदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
रेशनकार्डची होळी करत नागरिकांचे आंदोलन हेही वाचा -ठाणे : शिळ फाटा येथे आगीत 13 गोडाऊन जळून खाक
प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला शिधावाटप दुकानात धान्य मिळते. मात्र, ही तारीख चुकल्यास त्या शिधापत्रक धारकाला धान्य दिले जात नाही. या धान्याचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
हेही वाचा -ख्यातनाम चित्रकार अकबर पदमसी यांचे निधन
शिवाय धान्य देताना मापात घोळ करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या संबंधी अन्न नागरी पुरवठा विभाग, शिधावाटप अधिकारी यांच्याकडे तक्रार करून देखील शिधावाटप दुकानदारांवर कारवाई केली जात नाही, असेही आंदोलकांनी सांगितले.