महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एजन्सी कार्यालय फोडून १० लाखांची सिगारेट पाकिटे लंपास - agency

भिवंडी शहरात दिवसागणिक चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. कणेरी रामेश्वर मंदिर येथील  सहाय्यक पोलीस आयुक्त (पूर्व ) कार्यालयासमोर गजबजलेल्या वस्तीतील कृष्ण कॉम्प्लेक्समधील सिगारेट एजन्सीचे कार्यालय फोडून सुमारे १० लाख रुपयांच्या सिगारेटचे पाकिटे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

चोरट्यांनी फोडलेले तावदान

By

Published : Mar 1, 2019, 11:04 PM IST

ठाणे - भिवंडी शहरात दिवसागणिक चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. कणेरी रामेश्वर मंदिर येथीलसहाय्यक पोलीस आयुक्त (पूर्व ) कार्यालयासमोर गजबजलेल्या वस्तीतीलकृष्ण कॉम्प्लेक्समधील सिगारेट एजन्सीचे कार्यालय फोडून सुमारे १० लाख रुपयांच्या सिगारेटचे पाकिटे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

घटनास्थळ


या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. प्रदीप माधव गुप्ता या व्यावसायिकाची ओम इंटरप्रायझेस नावाने जीपीआय कंपनीच्या फोर स्क्वेअर व अन्य तत्सम महागड्या सिगारेटची मोठीएजन्सी आहे. शहरासह तालुक्यात दररोज लाखो रुपयांचा सिगारेटचे वितरण केले जाते.


या दुकानात गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ लाख रुपयांचा माल आला होता. त्यातच आज पहाटेच्या सुमारास या कार्यालयाचे दोन लोखंडी चॅनल गेटवरील कडीकोयंडा तोडून आतील शटरचे लॉक न उघडल्याने खिडकीच्या काचेचे तावदान फोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी कार्यालयातील एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी वितरणासाठी काढून ठेवलेला माल असा मिळून तब्बल १० लाख रुपयांची सिगारेटची पाकिटे लंपास केली आहे. या चोरीच्या घटनेचा पुरावा मागे राहू नये यासाठी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर मशीन सुद्धा पळवून नेले आहे.

या घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस आयुक्त किसनगावित, शहर पोलीस ठाण्याचेवरिष्ठपोलीस निरीक्षकसुभाष कोकाटे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास कार्य सुरू केले आहे. अधिक तपास करण्याच्या दृष्टीने ठाणे येथूनठसे तज्ज्ञ व श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे. अत्यंत गजबजलेल्या रस्त्या लगतच्या व विशेष म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इमारतीमध्ये एवढी मोठी चोरीचीघटना घडल्याने पोलीस प्रशासनाच्या रात्रीच्या गस्ती बाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details