नवी मुंबई - स्वच्छ सर्वेक्षणाच्या पहिल्या दोन तिमाहीत नवी मुंबईने देशातून तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मान मिळवला आहे. नवी मुंबईत स्वच्छतेसंबंधी जनजागृती व्हावी म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून चित्ररथ साकारला आहे.
नवी मुंबईत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी चित्ररथ - cleanliness
नवी मुंबईत स्वच्छतेसंबंधी जनजागृती व्हावी म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून चित्ररथ साकारला आहे.
देशात स्वच्छ सर्वेक्षणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये आलेल्या तिसरा क्रमांक टिकवण्यासाठी लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन जोरदार प्रयत्न करीत आहे. अभियानामधील नवी मुंबईकरांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती सुरू केली असून पालिकेच्या माध्यमातून चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथावर स्वच्छते संबधी जनजागृतीसाठी एलईडीच्या माध्यमातून संगीतमय व्हिडीओ क्लिप्स प्रसारित करण्यात येत आहे. या चित्ररथावर ओला व सुका कचरा तसेच घातक घरगुती कचरा यांच्यासाठी असणारे तीन प्रतिकात्मक डबेही ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक चौकात व गल्ल्यांमध्ये हा रथ फिरवून स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे. नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन नवी मुंबईला पहिल्या तिमाहीमध्ये देशातील तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर हे मानाकंन टिकवून ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
हेही वाचा - दुचाकीस धक्का लागल्याच्या रागातून ट्रेलरमधील केमिकल पावडर दिली रस्त्यावर फेकून; अज्ञातांचा शोध सुरू