महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवजन्मोत्सव 2020 ! कल्याणमध्ये मिरवणुकीत विविध चित्ररथांसह प्रबोधनात्मक देखावे - Chitrarath procession in kalyan

शिवसेना कल्याण शहर शाखेतर्फे गुरुवारी सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत शिवचरित्रावर आधारित विविध चलचित्रे, आदिवासी तारपा नृत्य, ढोल ताशा पथकांचे वादन, प्रबोधनात्मक देखावे तसेच कार्टून, महिला-पुरुष लेझीम पथक यांचा समावेश होता.

कल्याण ठाणे
शिवजन्मोत्सव 2020

By

Published : Mar 13, 2020, 8:59 AM IST

Updated : Mar 13, 2020, 9:35 AM IST

ठाणे - राज्यभरात गुरुवारी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवसेना कल्याण शहर शाखेकडून शहरातील प्रमुख मार्गावर सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये विविध चित्ररथांसह प्रबोधनात्मक देखावे आणि विविध पारंपरीक वाद्यांचे वादन हे मिरवणुकीत आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.

शिवजन्मोत्सव निमित्त कल्याणमध्ये मिरवणुकीत विविध चित्ररथांसह प्रबोधनात्मक देखावे...

हेही वाचा..."शिवजयंती आपला सण.. तोही आपण तिथीनुसारच साजरा करू"

शिवसेना कल्याण शहर शाखेतर्फे गुरुवारी सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत शिवचरित्रावर आधारित विविध चलचित्रे, आदिवासी तारपा नृत्य, ढोल ताशा पथक, प्रबोधनात्मक देखावे कार्टून, महिला-पुरुष लेझीम पथकाचा समावेश होता. कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवरील शासकीय विश्रामगृहाच्या आवारातून या मिरवणुकीला सायंकाळी साडेसहा वाजता सुरुवात झाली होती. ही मिरवणूक महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दूध नाका, पारनाका मार्गे शंकरराव चौक येथे या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील ,आमदार तथा शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, महानगरप्रमुख विजय साळवी ,गटनेते दशरथ घाडीगावकर यांच्यासह बहुतांश नगरसेवक व शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा...एखादा ज्योतिरादित्य सिंधिया आमच्या सोबत येईल आणि आमचे सरकार पुन्हा येईल, मुनगंटीवारांचा सरकारला टोला

दरम्यान, कल्याणच्या रामबाग शिवसेना शाखेकडून एक वादग्रस्त चित्ररथ तयार करण्यात आला होता. या रथावर एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे यांच्या फोटोला चपलेचा हार घातलेला होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणारा श्रीपाद छिंदम याच्या फोटोला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे बाण मारताना चित्र दाखवण्यात आले होते. अफजलखानाचा वध या चित्ररथावर हे दृष्य दाखवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या चित्ररथांना आक्षेप घेतला. रामबागच्या शिवसैनिकांना अफजलखानाच्या वधाचे पोस्टर काढण्यात सांगून माजी आमदार वारीस पठाण यांच्या फोटोच्या गळ्यातील चपलेचा हार देखील काढण्यात सांगितले. त्यानंतर मिरवणुकीत या चित्ररथाला परवानगी दिली जाणार असल्याची सांगितले होते. पोलिसांनी दखल घेतल्याने या चित्ररथावरील आक्षेपार्ह पोस्टर व फोटो काढून टाकण्यात आले.

Last Updated : Mar 13, 2020, 9:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details