महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात लहान मुलांसाठी उभारले चिल्ड्रन बस शेल्टर - चिल्ड्रन बस शेल्टर न्यूज

शाळेच्या वाहनांची वाट पाहत असताना लहान मुलांना कधी कधी मुलांना ऊन-पाऊस-वाऱ्याचा त्रास सहन करावा लागतो. या पासून शाळकरी मुलांची सुटका व्हावी यासाठी ठाण्यात चिल्ड्रन बस शेल्टर उभारण्यात आले आहे.

चिल्ड्रन बस शेल्टर
चिल्ड्रन बस शेल्टर

By

Published : Jan 10, 2020, 7:51 AM IST

ठाणे - शाळकरी मुलांना शाळेत जाताना रस्त्यांवर उभे राहून शाळेच्या बसची वाट बघावी लागते. यात कधी कधी मुलांना ऊन-पाऊस-वाऱ्याचा त्रास सहन करावा लागतो. या पासून शाळकरी मुलांची सुटका व्हावी यासाठी ठाण्यात चिल्ड्रन बस शेल्टर उभारण्यात आले आहे.

लहान मुलांसाठी उभारले चिल्ड्रन बस शेल्टर


नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक चौदामध्ये पाच ठिकाणी हे चिल्ड्रन बस शेल्टर उभारले आहे. पहिल्या टप्प्यात दोस्ती विहार गृहसंकुल, कोरस नक्षत्र गृहसंकुल, रुणवाल प्लाझा गृहसंकुल या तीन ठिकाणी हे बस शेल्टर उभारण्यात आले होते. त्यानंतर डवले नगर बस डेपो, वर्तक नगर येथेही चिल्ड्रन बस शेल्टर केले आहेत.

हेही वाचा - 'साहित्य संमेलनाला जाऊ नका' संमेलनाचे उद्घाटक ना. धों. महानोर यांना धमकी
शाळेमध्ये जाताना लहान विद्यार्थ्यांना आनंद मिळावा आणि त्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी या प्रयोगाचा फायदा होत आहे. मुलांच्या आवडीच्या कार्टून्सचा वापर करून हे बस शेल्टर तयार केले आहेत. लवकरच राहिलेल्या ठिकाणी बस शेल्टर उभारण्यात येतील, अशी माहिती पूर्वेश सरनाईक यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details