ठाणे - एका अल्पवयीन मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील कोळेगावात उघडकीस आला आहे. त्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी दिनेश लावहरी (वय ३६) या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीला अटक - thane
बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या कोळेगाव परिसरात ९ वर्षीय मुलगा आपल्या माता-पित्यासह राहतो. त्याच चाळीत हाऊसकीपिंगची नोकरी करणारा नराधम दिनेश हा देखील राहतो. त्याने १५ दिवसांपूर्वी पीडित मुलाला खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले. त्यानंतर नराधमाने त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला.
बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या कोळेगाव परिसरात ९ वर्षीय मुलगा आपल्या माता-पित्यासह राहतो. त्याच चाळीत हाऊसकीपिंगची नोकरी करणारा नराधम दिनेश हा देखील राहतो. त्याने १५ दिवसांपूर्वी पीडित मुलाला खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले. त्यानंतर नराधमाने त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा पीडित मुलाला बोलावले. मात्र, पीडित मुलाने नराधम दिनेशसोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या नराधमाने पीडित मुलाला मारहाण केली. मुलाकडून पालकांना घटनेची माहिती मिळाल्याने ते हादरून गेले. नराधम दिनेश हा पीडित मुलाला घरी नेऊन अश्लील आणि ब्ल्यू फिल्मचे व्हीडिओ दाखवायचा. त्यानंतर त्याच्यावर लैगिंक अत्याचार करत होता, असे पीडित मुलाने सांगताच आईवडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात मनपाडा पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे नराधम दिनेश हा विवाहीत आहे. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार विवेक भोईर करत आहेत.