ठाणे - खोकला आणि सर्दीच्या उपचारासाठी 2 महिन्यांच्या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्या चिमुरडीचा मृत्यू झाला. शहझीन असे मृत चिमुरडीचे नाव आहे. येथील डॉक्टरांनी चिमुकल्याला औषधाचा ओव्हरडोस दिल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाने संपूर्ण आरोप फेटाळले आहेत. यानंतर नातेवाईंकानी डॉक्टरवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्याला मारहाणही केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना कल्याणमधील श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये घडली.
कल्याण नजीकच्या मोहने परिसरात राहणारे नोमान काजी यांचा 2 महिन्याच्या चिमुरड्याला सर्दी, खोकला आणि कफचा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला कुटुंबीय आज (सोमवारी) श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. मुलाची परिस्थिती बघून डॉक्टरने औषध दिले. त्यांनतर मुलाला परत घरी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर मुलाला ओव्हरडोस दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मुलाच्या कुटुंबीयांनी केला आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरला मारहाण केली. तसेच डॉक्टरवर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे.