ठाणे -आठवड्याभरापूर्वी बेपत्ता असलेल्या आठ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह राहत असलेल्या घराच्या परिसरातील एका कंपनीच्या लगत असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. २ येथील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात घडली. यश महेंद्र भुजंग(८) असे मुलाचे नाव आहे.
मृत यश हा उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. २ येथील रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील जैतवन बुध्दविहार जवळ आपल्या आईसोबत राहत होता. तो इयत्ता तिसरीत शिक्षण घेत आहे. यश हा २१ डिसेंबरला सायंकाळी ४च्या सुमारास घराबाहेरीत अंगणात खेळत असताना तो अचानक गायब झाला. गेल्या आठवड्याभरापासून त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. याप्रकरणी, त्याच्या घरच्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. अखेर तब्बल ८ दिवसानंतर रविवारी सायंकाळी त्याचा मृतदेह तो राहत असलेल्या परिसरातील कुकर कंपनीलगत असलेल्या पडीक जागेवरील पाण्याच्या टाकीत मिळून आला.
हेही वाचा -पाकिस्तानातून परतलेल्या गीता कुटुंबाच्या शोधात सोमवारी परभणीत