महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Severe water Supply : मुख्यमंत्र्यांच्या शहरात नागरिकांना भेडसावते पाणी टंचाईची समस्या - Severe water Supply

मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या टेंभी नाका धोबी अळी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई ( Severe water scarcity ) होत आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ( Water Supply Minister Gulabrao Patil ) यांनी राज्यभरात 22000 योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी भर सभेत त्यांचे अभिनंदन केले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात पाणीटंचाईमुळे वागळे स्टेट दिवा घोडबंदर रोड परिसरात आजही नागरिकांना पाण्यासाठी वन वन फिरावं लागत आहे.

Severe water Supply
नागरिकांना भेडसावते पाणी टंचाईची समस्या

By

Published : Nov 1, 2022, 2:28 PM IST

ठाणे: मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या टेंभी नाका धोबी अळी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई ( Severe water Supply ) होत आहे. नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. आता या पाणीटंचाईच्या विरोधात चक्क मुख्यमंत्र्यांच्या जवळील कार्यकर्त्यांना देखील महानगरपालिकेमध्ये वारंवार तक्रारी करण्याची वेळ आलेली आहे. मागील आठवड्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ( Water Supply Minister Gulabrao Patil ) यांनी राज्यभरात 22000 योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी भर सभेत त्यांचे अभिनंदन केले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात पाणीटंचाईमुळे वागळे स्टेट दिवा घोडबंदर रोड परिसरात आजही नागरिकांना पाण्यासाठी वन वन फिरावं लागत आहे.

नागरिकांना भेडसावते पाणी टंचाईची समस्या


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रकरणांमध्ये लक्ष दिले :दिवाळी सणांमध्ये देखील या नागरिकांना पाहण्यासाठी वन वन फिरावं लागलं हाच पाणीटंचाईचा त्रास कमी व्हावा त्यासाठी नागरिक प्रशासनाकडे मागणी करत आहेत. चरई विभागातील निखिल सतीश बुजगुडे यांच्याकडून प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार होत असून पत्रव्यवहार केल्यानंतर काही काळापुरतेच पाणी येत असल्याचं नागरिकांनी सांगितले. मात्र टेंबे नाकात सराई आणि धोबी आणि परिसरात एक स्वतंत्र टाकी असावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली. त्याचप्रमाणे या पाणीटंचाई विरोधात निखिल गुडझडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरला असून मुख्यमंत्र्यांकडे देखील याची तक्रार केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रकरणांमध्ये लक्ष दिले असून लवकरच या ठिकाणचा पाणी प्रश्न सुटणार आहे. आता या नागरिकांच्या मागण्या पूर्ण होत आहेत का किंवा या नागरिकांसाठी स्वतंत्र टाकी महानगरपालिका प्रशासन बसवते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

नवी मुंबई सारखे स्वतःचे धरण आवश्यक :नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतःच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन स्वतःच्या मालकीचे धरण तयार केले आहे त्यामुळे नवी मुंबईमध्ये पाणीटंचाई होत नाही आणि अशाच प्रकारे ठाणे महानगरपालिकेने देखील स्वतःचे धरण तयार केल्यास त्याचा फायदा ठाण्यातील नागरिकांना होऊ शकतो मागील अनेक वर्षंपासून धरणांचा विषय प्रलंबित असल्यामुळे ठाण्याला पाणीपुरवठ्यासाठी स्टेम एमआयडीसी जीवन प्राधिकरण या विभागांवर अवलंबून राहावे लागत आहे.


इमारतींची बांधकामे मोठ्या प्रमाणात परंतु पाणीपुरवठा नाही :ठाण्यात बांधकाम व्यावसायिक इमारतींचे इमले उभे करत आहेत. मात्र त्यांना देण्यासाठी पुरेसा पाणी पुरवठा नाही आणि यामुळेच पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. जोपर्यंत बांधकाम व्यावसायिकाकडे इमारत असते. तोपर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित होतो आणि इमारतीचा ताबा सोसायटीकडे गेल्यावर पाण्यासाठी रहिवाशांना वणवण करावी लागते.



शहरात पाणी टंचाई नाही :या विषयावर पालिका अधिकारी विनोद पवार यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ठाणे शहरात कुठेच पाणी टंचाई नसल्याचे त्यांनी सांगितले आहे चरई भागातील पाणी टंचाई साठी आम्ही क्रॉस कनेक्शन करून ही अडचण सोडवल्याचा दावा पवार करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details