ठाणे :महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांची ख्याती आता साता समुद्रा पलीकडे सुद्धा पोहोचली आहे. कारण त्यांचा समर्थक वर्ग न्यूयॉर्क शहरातही वाढू लागला आहे. युवासेना कोअर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या मित्र परिवारातर्फे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरांमधील टाइम स्क्वेअर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे. भारतीय वंशाच्या पण न्यूयॉर्कमध्ये स्थित असलेल्या
समर्थकांनी थेट न्यूयॉर्कमध्ये कापला केक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या समर्थकांनी थेट न्यूयॉर्कमध्ये केक कापत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अत्यंत कमी वेळात आपला पदभार सांभाळून महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरात विखुरल्या गेलेल्या मराठी माणसाच्या आणि भारतीयांच्या मनामनात घर करणारे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता प्रसिद्ध झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स आता न्यू यॉर्क येथील टाइम्स स्क्वेअर आणि ग्रँड सेंट्रल येथे झळकवण्यात आले आहेत.