ठाणे Tushar Deshpande News : आयपीएल क्रिकेटचं मैदान गाजविणाऱ्या कल्याणमधील वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे हा चेन्नई सुपर किंग्जच्या टीममध्ये उत्कृष्ठ खेळाडू ठरला आहे. तुषार देशपांडेची २००७ साली मुंबईतील १३ वर्षीखालील मुलांच्या संघात निवड पाहता, तेव्हापासूनच त्याने क्रिकेट जगतात भरारी घेतलीय. मात्र त्याची क्रिकेटच्या बाहेरीलही इनींगही थक्क करणारी आहे. त्याची शालेय जीवनापासून मैत्रिण असलेल्या 'नभा'शी लग्न गाठ बांधली जाणार आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात असल्याने दोघांची भेट झाली नव्हती. मात्र चार वर्षांपूर्वीच या दोघांची पुन्हा सोशल मीडियावर ओळख होऊन प्रेमाचे सुत जुळले होते.
तुषार देशपांडेचा जन्म १५ मे १९९५ झाली झाला. त्याचे आईवडील दोघेही सरकारी नोकरी होते. तुषारचे वडील उदय देशपांडे यांनाही किक्रेटची खूप आवड आहे. तेही किक्रेट खेळत होते. तुषारनं कल्याणमधील केसी गांधी स्कुलमध्ये शिक्षण घेतले. याच स्कुलच्या मैदानात तुषारनं किक्रेटचे धडे गिरवले आहे. विशेष म्हणजे याच स्कुलमधून हजार धावांचा जागतिक रेकॉड करणारा प्रणव धनावडेही किक्रेट जगतात विक्रमवीर ठरला होता. त्याच्यानंतर तुषार हा जागतिक स्थरावरील वेगवान गोलंदाजापैकी एक ठरला आहे.
इंडिया ए प्लेयर म्हणून निवड-आयपीएल सुरू होण्याआधी यंदाच्या मोसमात मुंबई संघातून तुषार हा सहा रणजी सामने खेळाला. तर नुकताच झालेल्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघातून महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तुषारने गोलंदाजी करत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा बळी घेतला होता. आयपीएलमधील उत्तम गोलंदाज असल्याची पुन्हा चुणूक दाखवल्याने त्याला यंदाचा इंडिया ए प्लेयर म्हणून निवड झाली आहे.
तुषारचे वडील उदय देशपांडे सांगतात की, तुषारला क्रिकेटच्या मैदानावरील आव्हानात्मक काळातही त्याने स्वतःला सावरले. विशेष म्हणजे 2019 मध्ये कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर त्याच्या आईचा मृत्यू झालानंतर संपूर्ण कुटुंबासाठी सर्वात मोठी परीक्षा होती. एकुलता एक मुलगा असल्याने हा धक्का सहन करणे त्याच्यासह माझ्यासाठीही कठीण होते. त्याकाळात “तो खूप अस्वस्थ झाला होता. त्याची आई गंभीर आजाराने ग्रस्त असल्यामुळे पेट्रोलियम शील्ड (ऑफिस साइड भारत पेट्रोलियमसाठी) स्पर्धा त्याला गमावली लागली होती. त्यानंतरही , मी त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.