महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chandrashekhar Bawankule: सुषमा अंधारेंनी आपली उंची पाहून टीका करावी - चंद्रशेखर बावनकुळे - रवी राणा व बच्चू कडू

सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) आपली उंची पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करावी, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला आहे.

Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Nov 4, 2022, 7:45 PM IST

Updated : Nov 5, 2022, 6:23 AM IST

ठाणे: सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) आपली उंची पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करावी, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला आहे. ते ३ दिवसाच्या ठाणे जिल्हा दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरुवात त्यांनी भिवंडीतून केली आहे. (Chandrashekhar Bawankule thane daura). यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टिका केली आहे. तसेच अपक्ष आमदार रवी राणा व बच्चू कडू यांच्यात सुरु असलेल्या वादात भाजपा पडणार नाही, मात्र दोघेही शिंदे सरकारमध्ये असल्याने त्यांनी किमान राज्य सरकारच्या हितासाठी रस्त्यावर तरी भांडू नये, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

चंद्रशेखर बावनकुळे

सुषमा अंधारेंनी आपली उंची पाहावी:राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सातत्याने टीका करत असतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप समाजसेवेचे काम केले आहे. महाराष्ट्रासाठी त्यांच एक व्हिजन आहे. तसेच काम करण्याची त्यांची एक शैली आहे. गेल्या ३५ वर्षापासून ते राजकारणात आहेत. त्यामुळे सुषमा अंधारेंनी आपली उंची काय? हा विचार करून फडणवीसांवर टीका करावी, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.

आमदार राणा - बच्चूंना वेगळं करण्यासाठी तिसऱ्या व्यक्ती: सध्या राज्याच्या राजकारणात अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद गाजत आहे. सध्या दोघांमध्ये जो वाद सुरु आहे, त्या वादात भाजपा पडणार नाही. मात्र दोघेही शिंदे सरकारमध्ये सामिल असल्याने त्यांनी किमान राज्य सरकारच्या हितासाठी तरी रस्त्यावर भांडू नये, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला आहे. या दोघांना वेगळं करण्यासाठी तिसरा कोणी तरी व्यक्ती प्रयत्न करत असल्याचा संशयही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

मंत्रालयाच्या गेटवर काय घडलं याची माहिती नाही: हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्रकारांनी विचारले. त्यावेळी उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, जर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आयडेंटी मागितली तर कोणीही असो त्यांनी आयडेंटिटी दिली पाहिजे. जे मंत्रालयाच्या गेटवर घडलं त्याची माहिती मला नाही. ते तुमच्याकडूनच समजले आहे.

तीन दिवसाच्या ठाणे जिल्हा दौऱ्यावर: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ३ दिवस ठाणे जिल्ह्याचा दौऱ्यावर असून त्यांनी संघटनात्मक बांधणी व भेटी यासाठी जिल्हा दौरा भिवंडी शहरातून सुरुवात केला आहे. या ३ दिवसीय दौऱ्यात भाजपा कार्यकर्ता बाईक रॅली, जिल्हा संघटनात्मक मेळावा, सामाजिक माध्यम बैठक, धन्यवाद मोदीजी कार्यक्रमा अंतर्गत दोन लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार आहेत. दरम्यान आज दुपारी गोपाळ नगर येथील पाटीदार हॉलमध्ये जिल्हा संघटनात्मक बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला.

Last Updated : Nov 5, 2022, 6:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details