ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाण्यावर आता भाजपने लक्ष केंद्रित केले असून आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बाईक रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले. (Chandrashekhar Bawankule bike rally). बावनकुळे हे आज दिवसभर ठाण्यात थांबून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठका घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. (Chandrashekhar Bawankule thane daura).
बावनकुळे यांचे बाईक चालवत रॅलीचे नेतृत्व: मुंबई नंतर ठाणे ह्या सर्वात मोठे बजेट असलेल्या महापालिकेवर गेली अनेक वर्षे शिवसेनेचा भगवा झेंडा अविरतपणे फडकत होता. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याना खिंडार पाडण्याचे काम आता भाजपने हाती घेतले आहे. भाजपच्या मिशन महापालिकेला सुरुवात झाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे शहराला भेट देऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांचा आजचा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात बाईक रॅलीने झाल झाली ज्यात स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाईक चालवत रॅलीचे नेतृत्व केले.