महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कामोठ्यात ऐन वर्दळीच्या ठिकाणी नगरसेविकेला लुटले - नगरसेविका लुटले

कामोठे वसाहतीतील कुसुम म्हात्रे यांना काही अज्ञात चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. कुसुम म्हात्रे या पनवेल महानगरपालिकेत भाजपच्या नगरसेविका आहेत.

kamothe
कामोठ्यात ऐन वर्दळीच्या ठिकाणी नगरसेविकेला लुटले

By

Published : Mar 3, 2020, 10:55 PM IST

Updated : Mar 3, 2020, 11:13 PM IST

नवी मुंबई - शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे चोरीच्या उद्देशाने महिलेचा खून करण्याचा प्रकार घडला असतानाच, दुसरीकडे कामोठ्यात चक्क ऐन वर्दळीच्या ठिकाणी नगरसेविकेला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. यामूळे नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीतील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कामोठ्यात ऐन वर्दळीच्या ठिकाणी नगरसेविकेला लुटले

कामोठे वसाहतीतील कुसुम म्हात्रे यांना काही अज्ञात चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. कुसुम म्हात्रे या पनवेल महानगरपालिकेत भाजपच्या नगरसेविका आहेत. रात्री नऊच्या सुमारास त्या मुंबई येथून एका कार्यक्रमातून परतत असताना, कामोठे परिसरातील महामार्गावर त्या उतरल्या, त्यांच्यासोबत आणखी 6 ते 7 महिला होत्या. कुसुम व त्यांच्यासोबत असणाऱ्या महिला कार्यकर्त्या या घराकडे परतत असताना जवळपास असणाऱ्या शुभांगण कॉम्प्लेक्सजवळ कुसुम यांना कुणीतरी आवाज दिला, त्यामुळे त्या तिथेच थांबल्या व सोबतच्या महिला पुढे निघून गेल्या. हे पाहून मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी कुसुम यांच्याजवळ येऊन त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चोरटे हे त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व सोन्याचे गंठण(मंगळसूत्र )हिसकावून नेण्यात यशस्वी झाले व मोटारसायकल घेऊन पळाले. पुन्हा परत फिरून येऊन चोरट्यांनी कुसुम यांना लुटण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी जोरात आरडाओरडा केला. हे पाहून चोरटे घटनास्थळावरून फरार झाले. रात्री 9 च्या दरम्यान कामोठे परिसरात मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. ऐन वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण आहे.

पोलिसांच्या तपासात उदासीनता

संबंधित चोरीची घटना घडल्यानंतर नगरसेविका कुसुम यांनी थेट कामोठे पोलीस स्टेशन गाठले. मात्र, त्यांना तुम्ही उद्या या असा सल्ला पोलिसांनी दिला. मी लोकप्रतिनिधी असताना मला अशी वागणूक पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आली, मग सर्वसामान्य माणसांचे काय होत असेल, अशी खंत नगरसेविका कुसुम म्हात्रें यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी अखेर कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Last Updated : Mar 3, 2020, 11:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details