ठाणे- मुंबईत रेल्वेचे धोकादायक पूल कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर रेल्वेकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील धोकादायक पूलाचे 'स्ट्रक्चरल ऑडीट' करण्यात आले होते. या ऑडीटनंतर धोकादायक असलेले पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले असून या पार्श्वभूमीवर आज कल्याण ते कसारा मार्गावर सकाळी 11.15 ते 3.15 वाजण्याच्या दरम्यान चार तासांचा मेगाब्लॉक करण्यात आला. या दरम्यान काही ठिकाणावरील अतिधोकादायक पूल पाडण्यात आले.
एल्फीस्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वेकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील धोकादायक पूलाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले होते. या ऑडीटच्या अहवालात अनेक पादचारी पूल धोकादायक असल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर ते धोकादायक पूल पाडून नवे पादचारी पूल तयार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने 11.15 ते 3.15 वाजण्याच्या दरम्यान चार तासाचा मेगाब्लॉक घेतला होता.