महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठेकेदाराचे पितळ उघडे, चक्रीवादळाच्या तडाख्यात स्मशानभूमी कोसळली - भिवंडीत स्मशानभूमी कोसळली

निर्सग चक्रीवादळाच्या तडाख्यात निष्कृठ दर्जाचे साहित्य वापरून उभारलेली स्मशानभूमी कोसळल्याची घटना समोर आली. ही घटना भिवंडी तालुक्यातील सांगे गावात घडली आहे.

cemetery collapsed due to Nisarga cyclone in thane
चक्रीवादळाच्या तडाख्यात स्मशानभूमी कोसळली

By

Published : Jun 4, 2020, 6:20 PM IST

Updated : Jun 4, 2020, 7:15 PM IST

ठाणे - निर्सग चक्रीवादळाच्या तडाख्यात निष्कृठ दर्जाचे साहित्य वापरून उभारलेली स्मशानभूमी कोसळल्याची घटना समोर आली. ही घटना भिवंडी तालुक्यातील सांगे गावात घडली असून, अशा परिस्थिती एखाद्या ग्रामस्थाचे निधन झाल्यास त्यांच्यावर अंतविधी करायचा कुठे? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

भिवंडी तालुक्यात २३९ ग्रामपंचायती असून, प्रत्येक गाव-पाड्यात स्मशानभूमी असावी असे शासनाचे धोरण आहे. यानुसार भिवंडी तालुक्यात शासनाने सुमारे ३०० च्या जवळपास स्मशानभूमींना परवानग्या दिल्या. याच पार्श्ववभूमीवर सांगे गावातही सुमारे ५ लाख निधी खर्च करून याच वर्षी मार्च महिन्यात येथील स्मशानभूमीचे कामपूर्ण करण्यात आले होते. मात्र, स्मशानभूमी उभारणाऱ्या ठेकेदाराने निष्कृठ दर्जाचे साहित्य वापरून उभारलेली स्मशानभूमी निर्सग चक्रीवादळाच्या तडाख्यात कोसळल्याने ठेकेदाराचे पितळ उघडले पडले आहे.

दरम्यान, याबाबत भिवंडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांच्याकडे विचारना केली असता, सांगे गावातील स्मशानभूमी कोसळल्याची माहिती आमच्यापर्यंत आली नाही. आम्ही कोरोनाबाधित रुग्णांच्या कामात व्यस्थ आहोत. आता लगेच बांधकाम विभागातील संबधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Jun 4, 2020, 7:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details