महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आपली होते दिवाळी, त्यांचा जातो जीव..!, भूतदयाळूंचा आक्रोश अन् आवाहन - लक्ष्मीपूजन

गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन सातत्याने केले जात असले, तरीही फटक्यांचा धूर मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. याच फटाक्यांमुळे मानवासह प्राणी व पक्षांवर विपरीत परिणाम होतो. फटाक्यांच्या आगीमुळे अनेक पशु-पक्षी जखमी होतात. वेळप्रसंगी त्यांना प्राणही गमवावे लागत असल्याचे पॉजचे संस्थापक निलेश भणगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Oct 26, 2021, 5:40 PM IST

ठाणे -गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन सातत्याने केले जात असले, तरीही फटक्यांचा धूर मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. याच फटाक्यांमुळे मानवासह प्राणी व पक्षांवर विपरीत परिणाम होतो. फटाक्यांच्या आगीमुळे अनेक पशु-पक्षी जखमी होतात. वेळप्रसंगी त्यांना प्राणही गमवावे लागत असल्याचे पॉजचे संस्थापक निलेश भणगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

भूतदयाळूंचा आक्रोश अन् आवाहन

फटाके प्राणी व पक्षांच्या जीवावर उठत तर नाही ना..?

शाळांमध्ये फटाकेमुक्त दिवाळीच्या कितीही शपथा घेतल्या, तरीही अनेक विद्यार्थी फटाके आणतात आणि पालकही त्यांना ते पुरवतात. मात्र, हे फटाके अनेक प्राणी व पक्षांच्या जीवावर उठत तर नाही ना..? याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळेच फटाकेविरहित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन वनविभागासह अग्निशामक दलाने यंदाही केले आहे. अनेकांना या काळात श्वसनाचे आजार जडतात. हे आजार दीर्घकाळ परिणाम करणारे असतात. फटाक्यांच्या आवाजामुळे अनेक प्राणी, पक्षी, कीटकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे पर्यावरण अभ्यासक मंदार सावंत यांनी मत व्यक्त केले आहे.

फटक्यामुळे घडतात आगीच्या घटना..?

दिवाळीच्या दिवसांत सर्वात जास्त आगी या फटाक्यांमुळे लागतात. पेटता फुलबाजा आकाशाच्या दिशेने भिरकावणे, भुईचक्र लाथाडणे, टेरेस किंवा गॅलरीत फटाके फोडणे, डबा झाकून फटाके वाजविणे अशा कृत्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे माणसांबरोबर आजुबाजुच्या पशु-पक्षांच्या जीवाला धोका निर्माण होतो. लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या कालावधीत दरवर्षी मुंबई, ठाणे जिल्ह्यात साधारणत: 200 आगीच्या घटना घडतात. अशा घटनांना जर आवर घालायचा असेल, तर चुकीच्या पद्धतीने व काही चुकीचे फटाके उडविणे बंद करणे गरजेचे आहे.

दिवाळीच्या काळात पक्षी अचानक गायब ..?

दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांमुळे जसे अनेक पक्षी व प्राणी जखमी होतात. तसेच जंगलांना आगी लागण्याच्याही घटना घडतात. गवत वाळलेले असेल तर हा वणवा दूरवर पसरतो. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण आदी शहरांत अनेक प्रकारचे पक्षी एरव्ही दिसतात. मात्र, दिवाळीच्या काळात हे पक्षी अचानक गायब होतात. कानठळ्या बसविणाऱ्या फटाक्यांच्या आवाजामुळे पक्षांना मोठा त्रास होतो. तसेच धुरामुळे श्वसनाचे त्रासही पक्षी व प्राण्यांना होतात. त्यामुळेच सर्वांनीच पर्यावरणाचा सांभाळ करत फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करणे गरजेचे असल्याचे आवाहन पक्षीप्रेमी महेश बनकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले आहे.

हेही वाचा -चायनीज गाडीवरील गल्ला पळविण्याच्या वादातून एकाचा खून, मालकासह पाच जण गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details