ठाणे- उल्हासनगर कॅम्प पाच परिसरात एका केबल व्यवसायिकाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. तोडफोडीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुख्य आरोपी नवीन केशवानी याला अटक केली आहे.
उल्हासनगरात केबल व्यवसायिकाच्या कार्यालयाची तोडफोड; घटना सीसीटीव्हीत कैद - ठाणे क्राईम न्यूज
उल्हासनगर कॅम्प पाच परिसरात एका केबल व्यवसायिकाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. तोडफोडीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केबल व्यवसायिक नरेश रोहरा यांनी आरोपी नवीन केशवानी याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार व एमपीडीएबाबत पोलिसांना मदत केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी नवीन केशवाणीने साथीदारासह नरेशच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचे सांगण्यात आले. तोडफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात नवीन केशवानी व त्याच्या टोळीच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गणगे करत आहेत.