महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा टेंपो पकडला, दोघांवर गुन्हा दाखल - काळा बाजार भिवंडी

भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरातील रेशनिंग दुकानांवर लाभार्थ्यांना पुरवण्यात येणारा गहू, तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा टेंपो श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. ही घटना मंगळवारी दुपारी पडघा येथील वजन काट्यासमोर घडली आहे.

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा टेंपो पकडला, दोघांवर गुन्हा दाखल
काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा टेंपो पकडला, दोघांवर गुन्हा दाखल

By

Published : Jun 3, 2021, 3:32 AM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरातील रेशनिंग दुकानांवर लाभार्थ्यांना पुरवण्यात येणारा गहू, तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा टेंपो श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. ही घटना मंगळवारी दुपारी पडघा येथील वजन काट्यासमोर घडली आहे.

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा टेंपो पकडला, दोघांवर गुन्हा दाखल

बोगस कंपनीच्या पावत्याच्या नावाने सुरु होता रेशनींगचा काळा बाजार.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनसामान्यांच्या कुटुंबियांना शासकीय धान्य दुकानातून केंद्र व राज्य सरकारकडून मोफत धान्य वितरण करण्याचे निर्देश देण्या्त आलेले आहेत. तसेच, ग्रामीण भागात धान्य मिळत नसल्याच्या तक्रारीही अनेकांकडून केल्या जात आहेत. दरम्यान, येथील पडघा परिसरातील स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना धान्य न देता दुकानातील गहू, तांदूळ मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्री करत असल्याची माहिती समोर आली. याबाबतची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली असता, श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल लोणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुंबई-नाशिक महामार्गावर सापळा रचून हा काळा बाजार उघडा पाडला. यामध्ये आयशर टेंपो (क्र. एमएच-एएम-१८६६) हा धान्याने भरलेला टेंपो वजन काट्यावर आलेला असताना, त्याच्याकडे गहू, तांदळाच्या खरेदी पावत्या मागितल्या. मात्र, चालक छोटू यादव याने बोगस पावत्या दाखवून सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वेगवेगळ्या कंपनीच्या छपाई असलेल्या गोण्याही आढळून आल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तहसीलदार अधिक पाटील व पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षिक दिनेश कटके यांना याबाबत माहिती दिली.

२ लाख ७० हजार रुपये किंमतीचे धान्य

कार्यकत्यांनी माहिती देताच, तालुका पुरवठा निरीक्षक दत्ता बांबळे व पडघा पोलिसांचे पथक तात्काळ पोहचले. त्यांनी पंचनामा केला असता, टेंपोत ५० किलो वजनाच्या गव्हाच्या १०० गोणी तर तांदळाच्या ६० गोणी आशा एकूण सुमारे ९ टन वजनाच्या २ लाख ७० हजार रुपये किंमतीचे गहू, तांदूळ टेंपोत आढळून आले आहेत. हा गहू, तांदूळ पडघा येथील धान्य व्यापारी सचिन सतिष बिडवी यांच्या गोदामातून भरल्याची कबुली चालक छोटू यादव याने दिली आहे. तर, घटनास्थळाचा पंचनामा सुरु असताना रेशनिंग दुकानदार अशोक पाटील रा. आमणे व अशोक भोईर रा. धामणगांव हे दोघे घटनास्थळी येऊन धान्य व्यापारी सचिन बिडवी यांना एकवेळ माफ करा अशी विनवणी करू लागले. यामुळे या काळ्या बाजारातील धान्य विक्रीत या दोघा रेशनिंग दुकानदारांचा सहभाग असावा असा संशय निर्माण झाला. सदरचे, धान्य व टेंपो पुरवठा निरीक्षक दत्ता बांबळे यांनी पडघा पोलिसांच्या ताब्यात दिले असून, टेंपो मालक बाळू शेठ रा. कल्याण व चालक छोटू यादव रा. उत्तर प्रदेश यांच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details