ठाणे - गणेशोत्सव सणासुदीच्या दिवसांत संधीसाधू चोरट्यांनी कल्याण परिसरात धुमाकूळ घातला आहे. स्टेशन परिसरात खरेदीत व्यस्त असलेल्या तीन महिलांच्या पर्समधून हातचलखीने मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडल्या. या तिन्ही घटनांची नोंद महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवांची धामधूम चोरांच्या पथ्यावर; कल्याणच्या स्टेशन परिसरात लागोपाठ तीन महिलांच्या पर्स लंपास - महिलांच्या पर्स लंपास
गणेशोत्सव सणासुदीच्या दिवसांत संधीसाधू चोरट्यांनी कल्याण परिसरात धुमाकूळ घातला आहे. स्टेशन परिसरात खरेदीत व्यग्र असलेल्या तीन महिलांच्या पर्समधून हातचलखीने मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडल्या. या तिन्ही घटनांची नोंद महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.

कल्याण पश्चिमेत वाघचौरे चाळीत राहणारी महिला आपल्या नातेवाईकांसह काल सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौक येथे खरेदी करण्यासाठी पायी जात होती. सदर महिला खरेदीत व्यग्र असल्याची संधी साधत चोरट्याने तिच्या कापडी पिशवीला ब्लेड मारले. चोरट्याने या पिशवीमधील रोकड व मोबाईल असा 13 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
दुसरी घटना त्याच परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. कल्याण पश्चिमेतील आदर्श नगर परिसरात असलेल्या गणेश कृपा चाळीत राहणारी 46 वर्षीय महिला रविवारी चार वाजण्याच्या सुमारास खरेदी करत होती. इतक्यात चोरट्याने हातचलखीने तिच्या पिशवीतील रोख रक्कम व मोबाईल लांबविला. तिसरी घटनाही त्याच परिसरात घडली. कल्याण पश्चिमेत परिसरात राहणाऱ्या भावना गायकर या देखील खरेदीसाठी शिवाजी चौक परिसरात आल्या होत्या. चोरट्याने त्यांच्या पर्समधील रोख रक्कमेसह मुद्देमाल लंपास केला. या तिन्ही घटना लागोपाठ घडल्या असून या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. या तक्रारींनुसार पोलिसांची वेगवेगळी पथके चोरट्यांचा शोध घेत आहेत.